मालेगाव पालिकेत स्थायी व महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड

मालेगाव : येथील महापालिकेत स्थायी व महिला बालकल्याण समितीच्या नवीन सदस्यांच्या निवडीसाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि.१४ रोजी घेण्यात आलेल्या या महासभेत महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव राजेश धसे उपस्थित होते. आघाडीचे चार सदस्य निवृत्त झाल्याने व एका सदस्याने राजीनामा दिल्याने महागटबंधन आघाडीच्या गटनेत्या शान-ए- हिंद यांनी महापौर शेख यांच्याकडे एकूण पाच नावे दिलीत.

मालेगाव : येथील महापालिकेत स्थायी व महिला बालकल्याण समितीच्या नवीन सदस्यांच्या निवडीसाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दि.१४ रोजी घेण्यात आलेल्या या महासभेत महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, उपायुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव राजेश धसे उपस्थित होते.
आघाडीचे चार सदस्य निवृत्त झाल्याने व एका सदस्याने राजीनामा दिल्याने महागटबंधन आघाडीच्या गटनेत्या शान-ए- हिंद यांनी महापौर शेख यांच्याकडे एकूण पाच नावे दिलीत. यात पाचवे नाव एमआयएम नगरसेवक अब्दुल मजीद यांचे असल्याने महापौर शेख यांनी मजीद हे आघाडीचे सदस्य नसल्याने त्यांच्या नावास मंजुरी देण्यात नकार दिला. मजीद यांच्या नावास नकार दिल्याने गटनेत्या शान-ए- हिंद व डॉ.खालिद परवेज यांनी संतप्त होत महापौरांच्या निर्णयावर आक्षेप घेतला. महापौर शेख यांनी मजीद हे एमआयएमचे सदस्य असून नियमानुसार एमआयएमचे एक सदस्यचे नाव स्थायीसाठी मंजूर झाले असल्याने आघाडीच्या गटातून त्यांचे नाव घेतले जाऊ शकत नसल्याचे सांगत त्यांची मागणी फेटाळली. महापौरांच्या या निर्णयामुळे १६ सदस्य असलेल्या या स्थायी समितीत बुधवारी झालेल्या विशेष महासभेत एकूण १५ नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. तर एक जागा रिक्त राहिली आहे. यानंतर ९ सदस्यीय महिला व बालकल्याण समिती सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली.

• स्थायी समिती सदस्य 

काँग्रेस – नंदकुमार सावंत, जैबुन्निसा नुरुल्ला, शबाना शेख सलीम, नइम पटेल, मोह. सुलतान

शिवसेना – कविता बच्छाव, आशा आहेर, राजाराम जाधव

महागटबंधन आघाडी – शेख जाहिद शेख जाकीर, अन्सारी तन्वीर मोह. जुल्फेकार, मो. मुस्तकीन मोह.मुस्तफा, अन्सारी सबिहा मोह.मुजम्मील

भाजपा – तुळसाबाई साबणे, छायाबाई शिंदे

एमआयएम – शेख खालिद परवेज

• महिला बालकल्याण समिती सदस्य 

काँग्रेस – मोह. कमरुन्निसा रिजवान, सलीमा बी सैय्यद सलीम, रिहानाबानो ताजूद्दीन

महागटबंधन आघाडी – अन्सारी मन्सूर अहमद, अन्सारी असाफा मोह. राशीद, अफसररुन्निसा मोह. आरिफ

शिवसेना – प्रतिभा सचिन पवार

भाजपा – सुवर्णा राजेंद्र शेलार

एमआयएम – सादिया लईक हाजी