माकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी नेतृत्व दायी भूमिका बजावली. जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या धड्याचे त्यांनी नेतृत्व केले, त्यांना न्याय मिळवून दिला. नाशिक शहरातील व जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटनेतील नेत्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. शेतकरी कामगार यांच्या चळवळी बरोबरच वर्तमानपत्रांमधून ते सातत्याने लिखाण करत असत. देशपांडे यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे.

    नाशिक : माकपाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे आज सकाळी निधन झाले. ‌गेल्या एक आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी काळात प्रकृती सुधारत असतानाच काल सायंकाळी त्यांची प्रकृती गंभीर होत गेली, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीधर देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशके भरीव कार्य केले. त्याबरोबर डावे पुरोगामी संघटना यांच्याबरोबर त्यांचा घनिष्ठ संबंध होता.

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी नेतृत्व दायी भूमिका बजावली. जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या धड्याचे त्यांनी नेतृत्व केले, त्यांना न्याय मिळवून दिला. नाशिक शहरातील व जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटनेतील नेत्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते. शेतकरी कामगार यांच्या चळवळी बरोबरच वर्तमानपत्रांमधून ते सातत्याने लिखाण करत असत. देशपांडे यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाली आहे.

    श्रद्धांजली

    मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे आज कोरोनाच्या संसर्गामुळे दुःखद निधन झाले.‌ सातत्याने शेतकरी कामगार यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लढा देणारे कॉम्रेड श्रीधर देशपांडे डाव्या पुरोगामी चळवळीतील एक महत्वाचे नेते होते. विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशके भरीव कार्य केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी नेतृत्वदायी भूमिका बजावली. जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय देशपांडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृत आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

    भावपूर्ण श्रद्धांजली !

    छगन भुजबळ,
    मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य. तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.