मुद्रांक व नाेंदणी शुल्कातील सर्व्हर डाऊन ; चार दिवसांपासून काम बंद

शेतजमिनींच्या व्यवहाराचे प्रमाण वाढत आहे अशातच जे व्यवहार सुरू आहेत. त्यातही आॅनलाईनचे विघ्न येत आहे. रजिस्ट्री करण्यासाठी येणा-या अनेकांची त्यामुळे तारांबळ होत असून, एका रजिस्ट्रीसाठी तासन्तास थांबण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. महिन्यात अनेकदा सर्व्हर डाऊन रहात असल्याने अधिकारी वर्गाला काम करण्यात अडचणी येत आहे.

  लासलगाव : येथील मुद्रांक व नोंदणी शुल्क कार्यालयातील बीएसएनलचे सर्व्हर नसल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून काम बंद पडले आहे. परिणामी खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर त्याचा परिणाम झाला आहे. सर्व्हर बंद पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन असून, ते सुरू होण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

  नागरिकांना त्रास
  सर्व्हर बंद पडणे किंवा कमी गतीने चालने यामुळे दस्तनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची गेल्या चार दिवसांपासून तारांबळ होत असून, त्यांना तास न‌ ्तास रजिस्ट्री कार्यालयाच्या आवारात खोळंबत दस्तनोंदणीची वाट पाहावी लागते आहे. एकीकडे देश ५ जी कडे वाटचाल करीत असताना मात्र शासकीय कार्यालय अजून सर्व्हर डाऊनच्या विळख्यातच अटकलेले आहे.

  अधिकारी, कर्मचाऱ्यांची अडचण
  शेतजमिनींच्या व्यवहाराचे प्रमाण वाढत आहे अशातच जे व्यवहार सुरू आहेत. त्यातही आॅनलाईनचे विघ्न येत आहे. रजिस्ट्री करण्यासाठी येणा-या अनेकांची त्यामुळे तारांबळ होत असून, एका रजिस्ट्रीसाठी तासन्तास थांबण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. महिन्यात अनेकदा सर्व्हर डाऊन रहात असल्याने अधिकारी वर्गाला काम करण्यात अडचणी येत आहे. याकरिता पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे दस्त नोंदणीच्या कामाला गती येत नाही. मुद्रांक विभागातील अधिकारी सांगतात की, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे दस्त नोंदणीला वेळ लागत आहे.

  गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने दस्त नोंदणी थांबलेली आहे याबाबत बीएसएनएलला तक्रार दिलेली असून पाठपुरवठा सुरू आहे.

  - अभिजित देशपांडे, सब रजिस्टर

  “बीएसएनएलचे सर्व्हर डाऊन रहात असल्याने दस्त नोंदणी काम करण्यात अडचणी येत आहे. एका कामासाठी तासंतास ताटळकत रहावे लागत आहे. या करिता पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.”
  – भानुदास बकरे, ग्रामस्थ