Shiv Sainik got angry; Shiv Sena activists try to release stray dogs in front of BJP office in Nashik

नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली. या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. राणे यांनी वरुण सरदेसाई यांचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप केला होता.

    नाशिक : शिवसेना नेते वरुण सरदेसाई आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनंतर नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना दिसले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर अक्षरश: राडा घातला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला.

    नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली. या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. राणे यांनी वरुण सरदेसाई यांचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप केला होता.

    वाझे बेटिंगवाल्यांकडून पैसे उकळतात. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचा फोन जातो. तुम्ही बुकींकडे जे पैसै मागितले त्यातील आमचा हिस्सा किती?, असे सरदेसाई यांनी वाझेंना विचारल्याचे फोनवरील संभाषण आहे. याप्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास करावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली होती.