मुद्रांक घोटाळ्या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्रामचे उपोषण

देवळा तालुक्यात उघड झालेल्या व राज्यभर व्याप्ती असलेल्या बनावट मुद्रांक घोटाळ्याची गंभीरता मोठी असून सदर गुन्ह्याचा तपास सीआयडी व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा. गुन्ह्यातील आरोपींच्या सर्व प्रकारच्या मालमत्तांची सखोल चौकशी तातडीने करण्यात यावी, दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. हा मुद्रांक छेडछाडीचा नाही तर बनावट मुद्रांक तयार करण्याचा प्रकार असल्याने हा गंभीर गुन्हा आहे.

    देवळा : मुद्रांक घोटाळ्यातील मुद्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर हे सोमवारी (दि. १५) लाक्षणिक उपोषण करणार आहेत. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले असल्याची माहिती आहेर यांनी दिली.

    देवळा तालुक्यात उघड झालेल्या व राज्यभर व्याप्ती असलेल्या बनावट मुद्रांक घोटाळ्याची गंभीरता मोठी असून सदर गुन्ह्याचा तपास सीआयडी व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा. गुन्ह्यातील आरोपींच्या सर्व प्रकारच्या मालमत्तांची सखोल चौकशी तातडीने करण्यात यावी, दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. हा मुद्रांक छेडछाडीचा नाही तर बनावट मुद्रांक तयार करण्याचा प्रकार असल्याने हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी बनावट मुद्रांक तयार करण्याची प्रक्रिया करण्यात आली. तेथील मुद्रण करणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हा दाखल व्हावा. तसेच ज्या तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी सर्व नियम डावलून तातडीने नावांची नोंद सातबारा उताऱ्यावर केली त्यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करत चौकशी व्हावी आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर उपोषणस्थळी गर्दी न करता बाहेरून पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.