sanjay raut

महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे. त्यात नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut )यांनी केला आहे.

नाशिक: नाशिक महापालिकेवर (Nashik Municipal Corporation) भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. मुंबईसह (Mumbai) नाशिक (Nashik) महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहे. त्यात नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत       ( Sanjay Raut )यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर ही खांदेपालट करण्यात आल्याची चर्चा आहे. महानगरप्रमुखपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक जणांना डावलून सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आल्यानं नाराजीचा सूरही उमटताना दिसत आहे. तर दुसरीकडे नाशिक महापालिकेवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपनं देखील व्यूहरचना करण्यास सुरूवात केली आहे.

भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूर आणि पुण्यावर महाविकास आघाडीनं ताबा मिळवला आहे. त्यामुळे आता जनतेचा कल लक्षात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलं आहे. मुंबईत शिवसेना हा मोठा पक्ष आहे. त्यापाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील शिवसेनेचा ताकद वाढताना दिसत आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेचा महापौर शिवसेनेचाच असेल, असा दावा देखील संजय राऊतांनी केला आहे.