धक्कादायक ! दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन मांजामुळे चिरला गळा

येवला : पतंग उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या येवल्यात पतंग उत्सवाच्या पहिल्याच दिवशी नायलॉन मांजामुळे येवल्यात मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरुणाचा गळा चिरला असून त्याला त्याच्या गळ्याला २० टाके पडले आहेत. सागर गाडे असे या तरुणाचे नाव असून तो जळगाव नेऊर येथून येवल्याकडे येत असताना ही घटना घडली त्याला तातडीने येवला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला शिर्डी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

नाशिकमध्ये एका महिलेचा मांजामुळे गळा चिरण्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे मात्र नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा गळा चिरला गेल्यामुळे पतंग महोत्सवात नायलॉन मांज्याचा वापर होत असल्याचे उघड झाले आहे.काही दिवसांपूर्वी येवला शहर पोलिसांनी छापा टाकून नायलॉन मांजा जप्त करत कारवाई केलेली असतानाच ऐन पतंग उत्सवात नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा गळा चिरल्याने पोलिसांनी याची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे