marriage fraud

दोन शिक्षक हे टाकेद परिसरामध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी गेले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा मोठा उद्रेक बघायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील मालुंजे परिसरामध्ये एका विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आता पुढे आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन विवाह एकाच वेळेस आयोजित केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.

    इगतपुरी : तालुक्यातील एका लग्न सोहळामध्ये नवरदेवा सहित १६ व-हाडी नागरिक कोरोना पॉझिटिव आल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.एकाच दिवसात तालुक्याच्या ग्रामीण भागात जर विचार केला तर जवळपास ३० रुग्ण सापडले आहे.

    त्यामध्ये दोन शिक्षक हे टाकेद परिसरामध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी गेले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा मोठा उद्रेक बघायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील मालुंजे परिसरामध्ये एका विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आता पुढे आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन विवाह एकाच वेळेस आयोजित केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.

    त्यामुळे तालुका अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने लग्न समारंभाला हजेरी लावलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे.आत्तापर्यंत वराडी पैकी १६ लोक काेराेेना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.