धक्कादायक! आधी हत्या अन  नंतर परस्पर अंत्यविधीचा प्रयत्न ; आर्थिक हिशेब विचारल्याने पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या  

सटाणा पोलिसांकडून समजलेली हकिकत अशी की, बागलाण तालुक्यातील भवाडे येथिल संजय झिपरू पवार (३२) व त्याची पत्नी काळूबाई संजय पवार हे आपल्या तीन मुलांसह रहात होते संशयीत आरोपी संजय पवार याला सतत मद्यपान करत आसत तसेच मंजुरीला येतो; असे सांगून अनेकांकडून पैसे उसनवार करत होता.

    सटाणा : पती सारखा उसनवारी वाढवत असल्याने ते लोक घरी पैसे मागण्यासाठी येऊ लागले. पत्नीने याबाबत अटकाव करून घरात वाद घातल्याच्या राग येवून पत्नीचा पहाटेचा सुमारास धारदार कात्रीने मानेवर वर्मी घाव घातल्याने पत्नीचा खून करून आरोपी फरार झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील भवाडे येथे घडली आहे. याबाबत सटाणा पाेिलसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सटाणा पोलिसांकडून समजलेली हकिकत अशी की, बागलाण तालुक्यातील भवाडे येथिल संजय झिपरू पवार (३२) व त्याची पत्नी काळूबाई संजय पवार हे आपल्या तीन मुलांसह रहात होते संशयीत आरोपी संजय पवार याला सतत मद्यपान करत आसत तसेच मंजुरीला येतो; असे सांगून अनेकांकडून पैसे उसनवार करत होता. ते माणसं घरी येऊन वाद घालीत असत. ही गोष्ट संजय पवार याची पत्नी काळूबाई हिला आवडत नसल्याने ती याबाबत पतीलाविरोध करून वाद करत असे. याचा राग डोक्यात ठेवून ताे तिला नेहमी मारहाण करायचा. काल रात्री मद्यपान करून संजय पवार याचे पहाटेच्या सुमारास धारदार कात्रीने मानेवर तीन ते चार वर्मी घाव घालून पत्नी मयत झाली आहे; असे समजून त्याने मुलांना दमदाटी करत अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

    ही घटना सकाळी उघडकीस आली असता आदिवासी मंडळींनी अंत्यविधी उरकून घेण्याचा घाट घालून तशी तयारी सुरू केली होती; परंतु भवाडे येथील पाेिलस पाटीलांनी याबाबत सटाणा पाेिलसांत संपर्क साधून ही घटना सांगितली. त्यानंतर पाेिलस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाेिलस उपनिरीक्षक राहूल गवई व त्यांच्या सहकाऱ्यांनी भवाडे येथे धाव घेऊन अंत्यविधी रोखला व मयत काळूबाई हिचा मृतदेह सटाणा येथे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

    याबाबत सटाणा पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशीरा मयत काळूबाई हिचावर भवाडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित आरोपी संजय पवार याचा शोध सुरू असून, सटाणा पाेिलस ठाण्याचे पाेिलस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाेिलस उपनिरीक्षक राहुल गवई, प्रकाश जाधव, सागर चौधरी, जयंत साळुंखे, भाऊसाहेब माळी हे पुढील तपास करीत आहेत.