धक्कादायक ! सुपरवायझरच्या धाकाने बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

दिंडोरी : सुरगाणा येथील भावेश हिरामण वाडेकर (१७, रा. राशा ता. सुरगाणा) हा युवक फ्रुट कंपनीत काम करता होता. त्यास गुरुवारी ता. ७ जानेवारी रोजी कंपनीचे सुपरवाइजर यांनी मारझोड केली होती. तो बारावीत शिकत होता. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तो काही काळ कंपनीत कामाला होता. सुपरवाइजरच्या धाकाने तो बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह उमराळे रस्त्याच्या नजीक झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने. नेमकी आत्महत्या की घातपात अशा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी एक गोरख गोरडे राहणार उमराळे, मनोहर शिवराम गावित राहणार वाळूजीरा सुरगाणा, विशाल सुरेश सहारे, गुही सुरगाणा यांना अटक करण्यात आली आहे. ही हत्या की आत्महत्या याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले तसेच कल्पेश चव्हाण करत आहे.