gold

नव्या नियमावलीत शनिवार व रविवार दिवसभर व्यावसायीक आस्थापणे बंद ठेवण्याचा नियम स्थानिक प्रशासनाने दिला आहे. त्यातच मंगळवारची साप्ताहिक सुटी अश्या परिस्थितीत अठवड्यातील तीन दिवस बाजार बंद राहिल्यास एकीकडे व्यावसायिकांना याचा आर्थिक फटका बसू शकतो तर दुसरीकडे ग्राहकांचीही ऐन लग्नसराईत सोने खरेदीसाठी गैरसोय होणार आहे.

    नाशिक : शहर-जिल्ह्यात काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने काेराेनाचा प्रादूर्भाव राेखण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सर्व सूचनांचे तंताेतंत पालन करून शहरातील सर्व सराफी दुकाने आता दर मंगळवारीदेखील सुरू ठेवण्याचा निर्णय नाशिक सराफ असाेसिएशनच्यावतीने घेण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी प्रशासनाने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता साेमवार ते शुक्रवार दुकाने खुली राहतील.

    नव्या नियमावलीत शनिवार व रविवार दिवसभर व्यावसायीक आस्थापणे बंद ठेवण्याचा नियम स्थानिक प्रशासनाने दिला आहे. त्यातच मंगळवारची साप्ताहिक सुटी अश्या परिस्थितीत अठवड्यातील तीन दिवस बाजार बंद राहिल्यास एकीकडे व्यावसायिकांना याचा आर्थिक फटका बसू शकतो तर दुसरीकडे ग्राहकांचीही ऐन लग्नसराईत सोने खरेदीसाठी गैरसोय होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मंगळवारीही सराफ बाजार सुरु ठेवण्याचा निर्णय नासिक सराफ असोसिएशनने घेतला आहे. तशी माहिती अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरी किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहूल थोरात यांनी दिली आहे.