नवसाला पावणारी अन‌ अंगरोग दूर करणारी, भाविकांचे श्रद्धास्थान भगूरची श्री रेणुका माता

देवी मंदिरात वर्षभर नंददीप तेजत असतो, तसेच नवरात्र उत्सवात अनेक स्त्रिया मंदिर परिसरात घटी बसतात. तसेच कोजागरी पौर्णिमा व चैत्र पौर्णिमा अशी पूजाअर्चा केली जाते. दसऱ्याला देवीची भगिनी म्हणून करंजकर गल्लीतील रेणुका माता हीला मिरवणूक काढून दर्शनासाठी आणतात. तसेच चैत्र पौर्णिमेला देशमुख कुटुंबिया भगूर शहरातून देवीची मिरवणूक काढतात. दसऱ्याच्या दहा दिवस व चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जत्रा उत्सव असतो.

  भगूर : नवरात्राेत्सवात अनेक स्त्रिया मंदिर परिसरात घटी बसतात. भगूरची श्री रेणुका माता मंदिरातदेखील घटी बसविण्यात येतात. नाशिक जिल्ह्यातील पंचवटी परिसर हा प्राचीन काळात दंडकारण्य म्हणून ओळखला जात हाेता. परंतु ज्यावेळेस १४ वर्ष राम सीता लक्ष्मण वनवासात असताना येथे आले होते. तेव्हा भृगू ऋषी यांचा आश्रम हाेता. अशा या महान ऋषींच्या आश्रमात स्वयंभू मूर्तीची श्री रेणुका माता स्थापना झाली आहे. त्यामुळेच भूगू ऋषींच्या नावाने या शहराचे नाव भगूर असे पडले आहे. त्यामुळे पूर्वीचे लोक याला भगूरची रेणुकादेवी ही म्हणत.

  अष्टभूजा देवीच्या स्वयंभू मूर्तीचे झाले दर्शन
  राम व लक्ष्मण सीतेमाताच्या शोधासाठी भगूर मार्गे श्री क्षेत्र टाकेदला गेले, त्यावेळी त्यांनी या रेणुका मातेचे दर्शन घेतले होते, अशी पूर्वीपासून अख्यायिका आहे. सदरील मंदिरात दर्शन घेण्याआधी शरीर शुद्धीकरणासाठी मंदिराच्या समोर पुरातन नव्वद पायऱ्यांचा जुनी विहिर(बारव) आहे. पूर्वी सदरील बारवचे प्रवेशदार हे मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत होते. सदरील बारवाचे वैशिष्ट्य असे सांगतात की, सदरील बारवात रेणुका मातेची सोन्याची परात, समइ व भांडे आहेत, असे म्हणतात. ज्यांना त्वचा रोग म्हणजे नायटा, खरुज अािद असेल त्यांनी या बारवात अंघोळ केली तर त्यांचा हा रोग नाहीसा होतो. तसेच पूर्वी भक्तांनी मुले हाेण्यासाठी नवस करत असत, तसेच नवस पूर्ण झाल्यानंतर हे भक्त बाळाचा पाळणा करून बारवात सोडत असत. सदरील मूर्ती ही पूर्वीपासूनच स्वयंभू असून अनेक वर्ष मूर्तीवर शेंदूर लावले असल्यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप दिसून येत नव्हते. परंतु कालांतराने शेंदराचा लेप पडल्यामुळे वाघावर बसलेल्या अष्टभुजा देवीच्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन झाले.

  मंदिराचा केला जीर्णोद्धार…
  सदरील देवी मंदिराचा परिसर भगूर देशमुख कुटुंबाच्या वतनदारी मधील असून पूर्वीपासून त्यामुळे पूर्वी देवीची पूजा अर्चा देशमुख कुटुंबीय करत होते. त्यामुळे सदरील मंदिराची जागा सरकारी कागदाेपत्री ही माजी नगराध्यक्ष जयवंतराव देशमुख यांच्या नावे आहे. तसेच मंदिराच्या दिवाबत्तीसाठी देशमुख कुटुंबियाकडून सहा एकर जमीन बान स्कूलच्या रोडला देण्यात आलेली आहे. सध्या ही जमीन पाळदे कुटुंब करत आहे. परंतु आजही देवीच्या मंदिराचे जुन्या काळातील भूषणे हे देशमुख कुटुंबाकडे ठेवली जातात. सदरील अभूषणे हे फक्त नवरात्र उत्सव ,दसऱ्याच्या व चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस घातली जातात. पूर्वी २० वर्ष देशमुख कुटुंबाचे माजी नगराध्यक्ष चिमणराव देशमुख हे मंदिराची पूजा अर्चा करत असत. कालांतराने सदरील मंदिरात ब्राह्मण पुराेहीत म्हणून चिंगरे कुटुंबीयांना पूजाअर्चा करण्यासाठी सांिगतले.परंतु त्यानंतर पुन्हा बारा वर्ष देशमुख कुटुंबीय पूजा-अर्चा करत असत. त्यावेळी मंदिराचे स्वरूप छोटेसे होते. परंतु त्यानंतर १९४१मध्ये नाशिक येथील कापड व्यापारी धंटीग कुटुंबीयांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी या मंदिराचे ट्रस्टी जयवंतराव देशमुख, चिमणराव देशमुख,पा.भा करंजकर, प्रभाकर ओझरकर व इतर तसेच चिंगरे बंधू नंतर २०१२ मध्ये कौलारू मंदिराची िजर्णोद्धार समिती स्थापन करून मंदिर उभारणी करण्यात आली. त्यात श्री निवास लोया, नंदकिशोर कासट,रमेश शर्मा,नंदन लाहोटी,उत्तमराव कासार,मदनलाल झंवर, बळवंतराव गोडसे यांनी लोकवर्गणीतून सदरील मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्यामुळे मंदिराला भव्य स्वरूप प्राप्त झाले .

  भगूर शहरातून देवीची मिरवणूक …
  आता देवी मंदिरात वर्षभर नंददीप तेजत असतो, तसेच नवरात्र उत्सवात अनेक स्त्रिया मंदिर परिसरात घटी बसतात. तसेच कोजागरी पौर्णिमा व चैत्र पौर्णिमा अशी पूजाअर्चा केली जाते. दसऱ्याला देवीची भगिनी म्हणून करंजकर गल्लीतील रेणुका माता हीला मिरवणूक काढून दर्शनासाठी आणतात. तसेच चैत्र पौर्णिमेला देशमुख कुटुंबिया भगूर शहरातून देवीची मिरवणूक काढतात. दसऱ्याच्या दहा दिवस व चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जत्रा उत्सव असतो. महाराष्ट्रातून अनेक भाविक दर्शनासाठी उपस्थित राहून मनोभावे पूजा करतात तसेच नवस ही करतात अशी तपोवनातील भक्तांना पावणारी रेणुका माता मंदिर आहे, अशी माहिती भगूरचे उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी दिली आहे.