…तर ही वेळ आली नसती , बेशिस्तांमुळेच परिस्थिती बिघडली : डाॅ. पिंप्राळकर

सध्या बाजारात इंजेक्शन, औषधे , ऑक्सिजन यांची माेठ्या प्रमाणात कमतरता भासते आहे.आता शासन स्तरावर यासाठी माेठी पावले उचलली जात आहेत. माेठमाेठे ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. आराेग्य व्यवस्थेत हाेणारे हे बदल भविष्यात निशि्चतच फायद्याचे ठरणार आहेत. काेराेनाचा कहर संपल्यानंतर ऑक्सिजनचे उत्पादन वाढलेले असेल. त्यामुळे भविष्यात ज्या रुग्णांना याची गरज पडेल, त्यांना याचा फायदा हाेईल. उत्पादन जास्त झाले तर दर कमी हाेतील आणि रुग्णांना उपचार करणे अधिक स्वस्त असेल

  नीलेश अलई , नाशिक : जानेवारीपर्यंत सर्व काही ठिक हाेते. मात्र देशातून काेराेना हद्दपार झाल्यासारखे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. सार्वजनिक कार्यक्रम सर्रास सुरू झाले आणि त्यातूनच काेराेेनाचा संसर्ग वाढत गेला. माेजक्या बेशिस्त नागरिकांमुळेच आज आपल्याला या परिसि्थतीचा सामना करावा लागताेय, असे स्पष्ट मत सह्याद्री हॉस्पिटलचे डाॅ. अभिषेक पिंप्राळकर यांनी व्यक्त केले.

  …तर ही वेळ आली नसती
  परदेशात हाेत असलेली वाताहात गांभीर्याने घेतली असती तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम सर्रास सुरू हाेते. शेकडाेंच्या संख्येने लाेक लग्नकार्याला जमा हाेऊ लागले. काेणत्याही ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन झाले नाही. अनेक वेळा निर्बंध घालूनही नागरिकांनी त्याचे पालन केले नाही. काेराेना हा काही एका दिवसात जाणारा नाही, याचे भान सर्वांनी ठेवले असते तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती.

  रेमडिसिवरचा अनावश्यक वापर झाला
  सर्वच काेराेेनाबाधितांना रेमेडिसिवीरचे इंजेक्शन दिले जात हाेते. या इंजेक्शनच्या वापरासाठी काही संकेत आहेत. ते पाळले गेले नाहीत. त्यामुळे या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आणि ज्या रुग्णाला खराेखर याची गरज आहे; त्याला ते उपलब्ध हाेऊ शकले नाही. रेमेडिसिवरचा याेग्य वापर हाेणे गरजेचे आहे. या इंजेक्शनच्या वापरासाठी असलेले निकष पाळूनच त्याचा वापर झाला तर तुटवडा कमी हाेऊन याेग्य त्या रुग्णांना त्याचा फायदा हाेईल.

  औषधांवर नियंत्रण याेग्यच
  सध्या रेमेडिसिविर आणि इतर काही इंजेक्शनचा बाजारात तुटवडा आहे. खुल्या बाजारात याची विक्री हाेत हाेती ताेपर्यंत चढ्या भावाने लाेक हे विकत हाेते. त्यानंतर शासनाने यावर नियंत्रण आणले आणि शासकीय अधिकाऱ्यांमार्फत याची विक्री करण्यास सुरूवात केली. ते याेग्यच झाले. कारण यामुळे याेग्य त्या रुग्णाला ते दिले जाऊ लागले आणि त्याचा काळाबाजारही काही प्रमाणात कमी झाला. सध्या या इंजेक्शनचे उत्पादनच कमी हाेत असल्याने त्याचा तुटवडा आहे; मात्र येत्या आठ ते दहा दिवसांत हा तुटवडाही भरून निघेल, असा आशावादही डाॅ. पिंप्राळकर यांनी यावेळी बाेलताना व्यक्त केला.

  आधीच तयारी करायला हवी हाेती
  इटली, फ्रान्स यासारख्या देशांमध्ये काेराेनाने थैमान घातले हाेते. यातून आपण काहीतरी शिकायला हवे हाेते. काेराेनाची दुसरी लाट येणार, हे त्यावेळीच गृहीत हाेते. मात्र त्यादृष्टीने आपली तयारी कमी पडली. आता जी संसाधने उपलब्ध करण्यासाठी धडपड चालली आहे; ती सहा महिने आधीच केली असती तर आज अनेक रुग्णांना त्याचा लाभ झाला असता; आणि आज जी हाराकिरी माजली आहे; ती माजली नसती. परदेशातील परिसि्थतीवर बारीक नजर ठेवून आपल्याकडे अशी परिसि्थती निर्माण झाली तर काय हाेईल, याचा अभ्यास करणे गरजेचे हाेते. ताे न केल्यानेच आज देश संकटात आहे.

  आकडेवारी लपणार नाही!
  सद्यसि्थतीत शहरात तरी काेराेना रुग्ण कमी हाेत असल्याचे दिसते आहे. यात आकडेवारी तर लपविली जात नाही ना? याबाबत विचारले असता, काेराेना चाचणी करताना आपण आधार कार्ड घेताे आणि त्याची माहिती अपलाेड केली जाते; त्यामुळे चाचणी केल्यानंतर ताे रुग्ण काेराेनाबाधित आहे की नाही, याची नाेंद सरकार दप्तरी आपोआपच हाेते. त्यामुळे काेराेनाबाधितांच्या आकडेवारीत काही लपवाछपवी हाेत असेल, असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  शासकीय रुग्णालयेही तयार असावीत
  काेेराेनाचे संकट अचानक आले आहे; मात्र गेल्या सहा महिन्यांचा विचार केला तर आपल्याला तयारी करण्यासाठी वेळ हाेता; या कालावधीचा वापर आपल्याकडे चांगल्या पद्धतीने झाला नाही, हे सत्य आहे. सर्वच भार खासगी रुग्णालयांवर देऊन चालणार नाही. काळाच्या ओघात शासकीय रुग्णालयेही अधिक सक्षम, अत्याधुिनक आणि रुग्णांचे समाधान करतील, अशी करावी लागतील. त्यामुळे खासगी रुग्णालयांचा भार कमी हाेईल, अशाप्रकारच्या आपत्तीप्रसंगी फक्त खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यामुळे भविष्यात आपल्याला याकडेही लक्ष द्यावे लागणार नाही.
  आराेग्य व्यवस्थेतील बदल फायद्याचे ठरतील

  सध्या बाजारात इंजेक्शन, औषधे , ऑक्सिजन यांची माेठ्या प्रमाणात कमतरता भासते आहे.आता शासन स्तरावर यासाठी माेठी पावले उचलली जात आहेत. माेठमाेठे ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. आराेग्य व्यवस्थेत हाेणारे हे बदल भविष्यात निशि्चतच फायद्याचे ठरणार आहेत. काेराेनाचा कहर संपल्यानंतर ऑक्सिजनचे उत्पादन वाढलेले असेल. त्यामुळे भविष्यात ज्या रुग्णांना याची गरज पडेल, त्यांना याचा फायदा हाेईल. उत्पादन जास्त झाले तर दर कमी हाेतील आणि रुग्णांना उपचार करणे अधिक स्वस्त असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.