राज्यस्तरीय कायाकल्प स्पर्धा : मालेगाव सामान्य रुग्णालय राज्यात दुसरे राज्यस्तरीय कायाकल्प स्पर्धा

मालेगाव : राज्य शासनाच्या कायाकल्प या स्पर्धेत मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाचा देखील समावेश होता.

मालेगाव : राज्य शासनाच्या कायाकल्प या स्पर्धेत मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाचा देखील समावेश होता. या स्पर्धेत राज्य शासनाकडून आलेल्या समितीने केलेल्या सर्वेक्षणात सामान्य रुग्णालयाला दुसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले असून शासनाकडून पारितोषिक रक्कम २० लाख रुपये मिळणार असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांनी दिली.

शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा या संदर्भात राज्य शासनाच्या समितीने यासंदर्भात संपूर्ण राज्यात केलेल्या सर्वेक्षणात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाने दुसरा क्रमांक पटकावला. राज्य शासनाकडून रुग्णालयाला पारितोषिक रक्कम २० लाख रुपयांची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचा समावेश होता. या स्पर्धेत रुग्णांना देण्यात येणारी सेवा, रुग्णालय परिसरातील स्वच्छता, उद्यान आदी सोयी सुविधांचे सर्वेक्षण करून रुग्णालयाला मानांकन देण्यात आले होते. यात मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाने दुसरा क्रमांक पटकावला. या आधी देखील केंद्र शासनाच्या लक्ष्य या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. शासनाकडून मिळालेल्या या धनराशीतून रुग्णालयात रुग्णांना अधिक चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने आरोग्य सुविधेची कामे करण्यात येणार असल्याचे डॉ.डांगे यांनी सांगितले. या स्पर्धेत चांगला मानांकन मिळावा या उद्देशाने डॉ.महेंद्र पाटील, डॉ.हितेश महाले तसेच रुग्णालय प्रशासनाने परिश्रम घेतले होते.