डुबेरेत साकारणार अत्याधुनिक ग्रामपंचायत इमारत

सिन्नर : डुबेरे येथे ग्रामपंचायतीची अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे तर प्रसिद्ध सटुआई देवी मंदिरासाठी ढोकी नदीवर पादचारी पुलाची उभारणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या निधीतून सुमारे अर्धा कोटी रुपयांतून ही कामे होणार आहेत. शिवसेनेचे युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून आकर्षक पूल व इमारत उभी राहणार आहे. शनिवार दि २४ रोजी सकाळी १० वाजता या कामांचे भूमिपूजन होणार आहे.

खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक हेमंत वाजे, पेशवे पतसंस्थेचे संस्थापक नारायणशेठ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, पंचायत समितीच्या सभापती शोभा बर्के, उपसभापती संग्राम कातकाडे, सदस्य संगीता पावसे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे, तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, नगराध्यक्ष किरण डगळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 7 हजार लोकसंख्या असलेल्या डुबेरेचा कारभार पुरातन पेशवेकालीन वेशीवरील ग्रामपंचायत कार्यालयात भरत होता. ग्रामपंचायतीसाठी अत्याधुनिक इमारतीची गरज व्यक्त केली जात होती.

शीतल सांगळे यांच्या प्रयत्नातून इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. ही तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वाधिक आकर्षक स्वरूपाची इमारत असेल. येथील प्रसिद्ध सटुआई मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांची परवड थांबवणे गरजेचे होते. त्याची निकड ओळखून मंदिराकडे जाण्यासाठी ढोकी नदीवर पादचारी पुलाची उभारणी होणार आहे. १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला फर्निचर तयार केले जाणार आहे. डुबेरे एक मॉडेल गावयुवा नेते उदय सांगळे यांच्या प्रयत्नातून डुबेरेत टिकाऊ व नेहमीपेक्षा वेगळ्या स्वरूपाची स्मशानभूमी उभी राहिली आहे. त्यानंतर जिल्हाभरात हेच मॉडेल राबविले गेले. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राची आकर्षक इमारत उभी राहिली. या मॉडेलचीही पाहणी विविध गावांतील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली. आता ग्रामपंचायत इमारतही आगळीवेगळी बांधण्यात येणार असल्याने डुबेरे विविध कामांचे मॉडेल गाव ठरणार आहे.