बाजारात तुफान गर्दी; निष्काळजीपणा तिसऱ्या लाटेकडे ढकलणार!

...तर पुन्हा लाॅकडाऊन : जिल्हाधिकारी

  नाशिक : काेराेनाचा प्रादूर्भाव माेठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊन शिथिल करता नागरिकांनी बाजारात ताेबा गर्दी केल्याने प्रशासनाची झाेप उडाली आहे. नागरिकांनी काेराेना नियमांचे पालन केले नाही तर शुक्रवारी आढावा घेऊन पुन्हा एकदा लाॅकडाऊन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

  पुन्हा संसर्गाचा धाेका
  काेराेेनाचा संसर्ग कमी झाला आहे; काेराेेना अजून पूर्णत: गेलेला नाही, याचे भान नागरिकांनी ठेवावे. अशाप्रकारच्या गर्दीमुळे पुन्हा एकदा काेराेेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात पसरून शहराला लाॅकडाऊनचा सामना करावा लागू शकताे. काेराेनाची तिसरी लाट येणार, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली आणि इतरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे. थाेडासा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकताे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर पहिल्याच दिवशी नाशिक शहरातील नागरिकांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मोठी गर्दी केली. नागरिकांचा प्रतिसाद पाहून बहुतेक शुक्रवारपर्यंतच अनलॉक सुरू राहील, असे वाटतअसल्याचे ते म्हणले. कारण आपल्यात आणि १०% मध्ये फक्त २०० पेशंट दररोजचा फरक असल्याचेही ते म्हणाले.

  ही तर तिसऱ्या लाटेची तयारी?
  लाॅकडाऊन शिथिल हाेताच नागरिकांनी बाजारात केलेली गर्दी म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण असल्याचे प्रतिक्रिया आराेेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या गर्दीमुळे माेठ्या प्रमाणात संसर्ग हाेऊन पुन्हा एकदा शहराला जीवघेण्या अडचणींचा सामना करावा लागू शकताे. गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून शहरात काेराेेनाचा संसर्ग वाढल्याने आराेेग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला हाेता. अाॅिक्सजन, रेमेडिसिवर, बेड यांचा तुटवडा झाला. त्यामुळे रुग्णांना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आता नागरिकांनी काळजी घेतली नाही तर पुन्हा एकदा हे संकट उभे राहील, यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी न करता काेराेेना नियमांचे पालन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

  … नियमांचे पालन करा
  लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे तसेच हातावर पाेट भरणाऱ्यांचे माेठ्या प्रमाणात हाल हाेतात. त्यामुळे लाॅकडाऊन करणे कुणालाही अावडत नाही. परंतु अशाच प्रकारची गर्दी हाेत रािहली अाणि पुन्हा एकदा काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागली तर लाॅकडाऊनशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर त्यांनी विनाकारण गर्दी टाळावी असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. जर अशीच गर्दी दररोज होत राहिली तर नाईलाजाने नाशिक लॉकडाऊनची वेळ ओढवू शकते, अशी शक्यता सध्या तरी व्यक्त केली जात आहे.

  बाजारपेठांत गर्दी
  मध्यवर्ती ठिंकाणी असलेल्या रविवार कारंजा, अशाेक स्तंभ, मेनराेड, शािलमार परिसरात सकाळापसूनच नागरिकांची गर्दी झाली हाेती. दहा दिवसांपासून असलेल्या लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर रस्त्यावर विक्री करणाऱ्यांचीही माेठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा खाेळंबा झाला हाेता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पाेिलसांना माेठी कसरत करावी लागली. दुकानांत काेराेेना नियमांचा फज्जा

  काेराेना नियमांचे पालन करूनच व्यवसाय करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असली तरी ठिकठिकाणी काेराेना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. अनेक दुकानांमध्ये साेशल डिस्टनि्संग पाळले गेले नाही तर काही ठिकाणी विना मास्क खरेदी-विक्री सुरू हाेती. व्यावसाियकांनी शासनाने ठरवून दिलेल्या काेराेना नियमांचे पालन केले नाही तर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.