अजब चोरीची चर्चा ; नायगव्हाण येथील पाझर तलावातून ४ ते ५ लाख किमतीची मासे चोरी

येवला : तालुक्यातील नायगव्हाण येथे गावालगत असलेल्या पाझर तलावातून लाखो रुपयांचे मासे चोरीला गेली असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.चोरीच्या या प्रकारामुळे ठेका घेतलेल्या दोन युवकांना मात्र लाखो रुपयांचा चुना लागला आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने मत्स्यव्यवसायासाठी पाझर तलावांचे लिलाव करण्यात आले होते प्रशांत पानपाटील व सम्राट पानपाटील यांनी हा लिलाव घेऊन त्यात रोहु, मिरगळ कटला, कोबडा, जातीचे असे ४४१ मत्सबिजाचे डब्बे सोडले होते या व्यवसायात सुमारे २ लाखाची गुंतवणूक करुन मत्स्यव्यवसाय सुरू केला होता. मासळीची साईज अर्धा ते एक किलो ची होती रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या मासळीवर डल्ला मारून पोबारा केला घटनास्थळी देशी दारुच्या बाटल्या मासे पकडण्यासाठी वापरले जाणारे तुटलेले जाळे अाढळून आले. या चोरीमुळे मत्सव्यावसायीकाला मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. येवला पो. स्टेशनला चोरीची माहिती देण्यात आली असून, गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती प्रशांत पानपाटील यांनी दिली.