भारत बंदला पाठिंबा देत निफाड तालुक्यात कडकडीत बंद

निफाड : केंद्र सरकारने  मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचा विरोध करत राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी निफाड तालुका बंद ठेऊन निफाड येथे कृ.उ.बा. उपबाजार आवार ते तहसील कार्यालया पर्यन्त निषेध मोर्चा काढत तहसिलदार यांना निवेदन देऊन कृषी विधेयकाचा निषेध करण्यात आला.

निफाड : केंद्र सरकारने  मंजूर केलेल्या कृषी विधेयकाचा विरोध करत राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी निफाड तालुका बंद ठेऊन निफाड येथे कृ.उ.बा. उपबाजार आवार ते तहसील कार्यालया पर्यन्त निषेध मोर्चा काढत तहसिलदार यांना निवेदन देऊन कृषी विधेयकाचा निषेध करण्यात आला.

कृषी कायदा संमत करतांना कुठल्याही शेतकऱ्याचा व  संघटना यांना विचारात न घेता फक्त बहुमताच्या जोरावर केंद्र सरकार हा अन्यायकारक कृषी कायदा संमत करून तो शेतकऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा विरोध म्हणून दिल्लीच्या वेशीवर पंजाब हरियाणा मधील लाखो शेतकरी हे कुटुंबासह आंदोलन करत दिल्ली कडे कूच करत आहे, त्यांना अडवण्याचा व आंदोलन मोडीत काढण्याचा सरकार जटील प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने जर अशीच आडमुठी भूमिका ठेवल्यास येत्या काळात शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी असलेला हा निफाड तालुका मागे हटणार नाही आणि या सर्व उद्भवणाऱ्या परिस्थितीस केंद्र सरकार जबाबदार राहील असे प्रतिपादन आमदार बनकर यांनी केले.

कामगार व शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र असल्याचे मत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार यांनी व्यक्त केले. प्रसंगी उपबाजार आवार निफाड येथे मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस व शेतकरी संघटनेचे नेते कार्यकर्ते व शेतकरी जमले होते, तहसील कार्यालयावर मोर्चा पोहचला असता केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या, तहसिलदार शरद घोरपडे  यांना निवेदन देत  शेतकऱ्यांच्या भावना केंद्र सरकारला कळवाव्या व  लवकरच तोडगा काढावा अन्यथा आमच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे यांनी व्यक्त केले. प्रहार संघटनेच्या वतीनेही निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, महिला प्रदेश सरचिटणीस अश्विनी मोगल, सुभाष कराड, जिल्हा उपाध्यक्ष इरफान सैय्यद, जि. प. सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, युवक अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, विधानसभा अध्यक्ष भूषण शिंदे, शहराध्यक्ष तनवीर राजे, सुरेश खोडे, शिवाजी ढेपले, माधवराव ढोमसे, निवृत्ती धनवटे, विलास बोरस्ते, विजय कारे, बाबासाहेब शिंदे, नाना पाटील भंडारे, धनंजय भंडारे, दत्तू मुरकुटे, नितीन कापसे, रावसाहेब गोळे, नारायण पोटे, जयराम मोरे, संजय सांगळे, बापूसाहेब कुंदे, उत्तम कुंदे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, विश्वास मोरे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश बनकर, पुंजा अप्पा तासकर, राजेंद्र मोगल, विनायक शिंदे, सुरेश कापसे, सचिन खडताळे,  दत्तात्रय डुकरे, सुनील निकाळे, राहुल नागरे, राजेंद्र बागडे, सुहास सुरळीकर, राजेश लोखंडे, शेतकरी संघटनेचे साहेबराव मोरे, प्रहारचे सागर निकाळे व कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी व सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.