वडनेर दुमाला येथे मनपाचे उपकार्यालय सुरू ; नगरसेवक पोरजे यांच्या प्रयत्नांना यश

प्रभाग २२ मधील वडनेर दुमाला व पिंपळगाव खांब येथील रहिवाश्यांणा जन्म दाखला,मृत्यू दाखला, मृत्यूची नोंद, घरपट्टी दारात बदल करणे, घरपट्टी/पाणीपट्टी बाबत(तक्रार)अर्ज, घरपट्टी दारात ५% सवलत(सोलर) अर्ज, माजी सैनिक यांना घरपट्टी दारात सवलतीबाबत अर्ज, घरपट्टी/पाणीपट्टी मालकी हक्कात बदल करणे बाबत अर्ज करण्यासाठी सिडको, नाशिकरोड  येथे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांचा वेळ,आर्थिक नुकसान होत होते.

    नाशिकरोड : गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग २२ मधील. वडनेर दुमाला व पिपळगांव खांब येथील नागरिकांनी मनपाच्या विविध दाखले घेण्यासाठी नाशिकरोड किंवा सिडको येथे जावे लागते असे. मात्र आता मनपाचे उपकार्यालय सुरू झाल्याने नागरिकांची ससेहाेेलपट थांबणार आहे. नगरसेवक केशव पोरजे यांनी वडनेर दुमाला येथे उपकार्यालय सुरू करण्यासाठी सतत पाठपुरावा केला हाेता. त्यांच्याच हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.

    प्रभाग २२ मधील वडनेर दुमाला व पिंपळगाव खांब येथील रहिवाश्यांणा जन्म दाखला,मृत्यू दाखला, मृत्यूची नोंद, घरपट्टी दारात बदल करणे, घरपट्टी/पाणीपट्टी बाबत(तक्रार)अर्ज, घरपट्टी दारात ५% सवलत(सोलर) अर्ज, माजी सैनिक यांना घरपट्टी दारात सवलतीबाबत अर्ज, घरपट्टी/पाणीपट्टी मालकी हक्कात बदल करणे बाबत अर्ज करण्यासाठी सिडको, नाशिकरोड  येथे जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांचा वेळ,आर्थिक नुकसान होत होते. या गैरसोयीची दखल घेत शिवसेना नगरसेवक केशव पोरजे यांनी याबाबत सतत पाठपुरावा केला. वडनेर येथे मनपाच्या निधीतून इमारत उभारली होती. याच इमारतीमध्ये नाशिक रोड विभागीय कार्यालय अंतर्गत उपकार्यालय सुरू करण्यात आले आहे.परिणामी  येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. याप्रंसगी  नगरसेवक केशव पोरजे, नगरसेविका सुनिता कोठूळे, नगरसेवक जगदीश पवार, योगेश गाडेकर, विभागीय अधिकारी संजय गोसावी, ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम कोठुळे, डॉ. चैत्राली चौधरी, गणेश जाधव, उत्तम जाधव, गणेश बनकर,किरण डहाळे, विक्रांत थोरात, संजय कोठुळे, आत्माराम आढाव, नितीन हांडोरे, स्वप्नील शहाणे, अरुण पोरजे, भूषण ताजनपुरे, भाऊसाहेब व्हेळाळ, अनिकेत शिंदे, विकास गिते, तुषार पाटील, संकेत भोसले, मयूर हंडोरे, आदित्य नागरे, वाळू आप्पा पोरजे, प्रभाकर बोराडे, देवळाली गाव, विहितगाव, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब नागरिक उपस्थित होते.

    वडनेर दुमाला, पिपळगांव खांब नागरिकांना शासकीय कामांसाठी लागणारे विविध दाखले किंवा घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी सिडको किंवा नाशिकरोड येथे जावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. तसेच हल्ला होत असल्याने उप कार्यालय सुरू यासाठी सतत मनपाकडे पाठपुरावा केला व कार्यालय मंजूर करून आणले. परिसरातील नागरिकांनी येथील सुविधा फायदा घ्यावा.

    - केशव पोरजे, नगरसेवक.