कोरोना संसर्ग झालेल्या आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने मुलीची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या

मृत महिलेचे नाव जया भुजबळ असून वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्य झाला मात्र आईच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलगी शिवानीने टोकाचं पाऊल उचलत सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली.

    नाशिक: राज्यात पसरलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आरोग्य व्यवस्थेवरही मोठा ताण निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना उपचारा अभावी आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एका धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक मध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलेला ऑक्सिजन बेड न मिळाल्याने  मृत्यू झाला, मात्र आपल्याच आईच्या मृत्यूचा धक्का सहन न करू शकल्याने मुलीने सॅनिटायझर पिऊन आपले आयुष्य संपवयाची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    मृत महिलेचे नाव जया भुजबळ असून वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्य झाला मात्र आईच्या मृत्यूचे दुःख सहन न झाल्याने मुलगी शिवानीने टोकाचं पाऊल उचलत सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    दरम्यान, नाशिक शहरातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट ४०टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आल्याने काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे. नवे रुग्ण सापडण्याच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात ६००० हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ४ हजार २२२ नवीन बाधित रुग्ण आढळले. गेल्या ६ दिवसात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनामुक्तांपेक्षा कमी आहे.

    दुसरीकडे नाशिक महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातच लसीकरण सुरु आहे.मात्र शहरातील इतर केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक लागले आहेत. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना उपलब्ध साठ्यानुसार लस मिळणार आहे, इतरांना मात्र अद्याप लसीचा प्रतीक्षा आहे. लस उपलब्धतेची माहिती मिळत नसल्याने नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळत आहे.