कांदा चाळीत गळफास घेत आत्महत्या

देवळा : तालुक्यातील लोहणेर येथील कांतीलाल बन्सीलाल परदेशी (वय ५०) या व्यक्तीने लोहणेर-खालप रस्त्यावरील शेतात असलेल्या कांदा चाळीत आत्महत्या केल्याची घटना आज घडली.

बन्सीलाल गुळेचा यांच्या शेतातील कांदा चाळीत हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास परदेशी यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर देवळा पोलिसांना पाचारण करण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नसून पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.मृत कांतीलाल परदेशी यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. माजी ग्रा.पं. सदस्य रतीलाल परदेशी यांचे ते लहान बंधू होत.