स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे कृषी कायद्यांची हाेळी

नाशिक : केंद्र सरकारने दडपशाहीच्या मार्गाने कृषी कायदे संमत केले अाहेत. शेतकऱ्यांना देशाेधडीला लावणारे हे कायदे तत्काळ रद्द करावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या उपस्थितीत शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी करण्यात आली.

केंद्राच्या कृषी कायद्यांची होळी करून संघटनेतर्फे भारत बंदला सुरुवात केली. केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना जमिनी अािण त्यांचे उत्पादन उद्योगपतींच्या घशात घालणारे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे हे माेेगलाई कायदे अाहेत, त्यामुळे ते रद्द झाले पाहिजे, अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.