देवळालीत वाहनांची ताेडफाेड; समाजकंटकांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

देवळालीगाव राजवाडा येथील व्यायामशाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वसाहतीत अज्ञातांनी वाहनांना लक्ष्य केले.रात्री चाकरमान्यानी काम करून आपले वाहने रस्त्याच्या कडेला नेहमी प्रमाणे लावल्या आणि झोपी गेले. समाजकंटकांनी रात्री उशिरा उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तर दुचाकींवर देखील हल्ला करण्यात आला.

    नाशिक: देवळालीगाव राजवाड्यातील व्यायामशाळेमागे अज्ञात समाजकटांनी मध्यरात्रीच्या सुमारास वाहनांवर दगडफेक करून पाच वाहनांचे नुकसान केले. दहशत माजविणऱ्यांविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  देवळालीगाव राजवाडा येथील व्यायामशाळेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या वसाहतीत अज्ञातांनी वाहनांना लक्ष्य केले.रात्री चाकरमान्यानी काम करून आपले वाहने रस्त्याच्या कडेला नेहमी प्रमाणे लावल्या आणि झोपी गेले. समाजकंटकांनी रात्री उशिरा उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या तर दुचाकींवर देखील हल्ला करण्यात आला.

    अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत अल्टाेकार (एमएच१५/डीसी/१२२२), रिक्षा (एमएच१५/ईएच/२९८२), टेम्पेा (एमएच१९/एक्यु ७८३६), मोटारसायकल (एमएच१५/जीई/७१७१), ॲक्टीव्हा दुचाकी (एमएच१५/ईसी/७१९८) या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.  याप्रकरणी नाशिकरोड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी उपनगर पोलीस ठाण्यातील अंतर्गत सुंदरनगर मध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली होती. अधिकारी रांना सुचना केल्या होत्या.गेल्या काही दिवसांपासून या परिरसरात गुंडांचा उपद्रव सुरू आहे.

    परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हाणामारी करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी अनेक भागातील अल्पवयीन गुन्हेगारांवर कारवाई करून गुन्हेगार मुक्त नाशिकरोड करण्याचा प्रयत्न केला. काही काळ तो यशस्वी ठरला. मात्र आता पुन्हा अल्पवयीन टोळीनी डोकेवर काढल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. यापूर्वी उपनगर पोलीस ठाण्यातील अंतर्गत सुंदरनगर मध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती.