नाेटा माेेजायचे मशीन नंतर घ्या, आधी महाराष्ट्राला काेराेनापासून वाचवा! :किरीट साेमय्या

गेल्या महिनाभरापासून देशातील रुग्णांच्या जवळपास निम्म्याहून अधिक रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळत आहेत. राज्यातील कोविड सेंटरची दूरावस्था झाली आहे. जाे-ताे फक्त आपापल्या तुंबड्या भरण्यात व्यस्त आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन टॅंक बसविण्यासाठी १०० काेटी रूपयांचे अनुदान आले आहे; मात्र काेठेही या कामाची सुरूवात झालेली नाही, इतके निष्काळजी सरकार आम्ही आजवर पाहिले नाही.

    नाशिक : राज्य शासन सत्तेत आल्यापासून केवळ कारणे दाखवत एक एक दिवस काढत आहे. राज्यात काेराेेनाचा आकडा माेठ्या प्रमाणात वाढताे आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. सध्या ते तर वेगळ्याच कामात व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला मरण्यासाठी वाऱ्यावर साेडून हे सरकार केवळ नाेटा माेजायचे मशीन घेण्यातच व्यस्त आहेत. त्यांना हवे तितके नाेटा माेजण्याचे मशीन घ्यावेत; मात्र आधी महाराष्ट्राला काेेराेनापासून वाचवा, असे आवाहन भाजपा नेते किरीट साेमय्या यांनी नाशिक भेटीत केले.

    गेल्या महिनाभरापासून देशातील रुग्णांच्या जवळपास निम्म्याहून अधिक रुग्ण केवळ महाराष्ट्रात आढळत आहेत. राज्यातील कोविड सेंटरची दूरावस्था झाली आहे. जाे-ताे फक्त आपापल्या तुंबड्या भरण्यात व्यस्त आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन टॅंक बसविण्यासाठी १०० काेटी रूपयांचे अनुदान आले आहे; मात्र काेठेही या कामाची सुरूवात झालेली नाही, इतके निष्काळजी सरकार आम्ही आजवर पाहिले नाही.

    मुख्यमंत्र्यांनी आता तरी काेराेना का वाढताेय, हे समजून घेतले पािहजे. त्यांनी हे समजून घेतले नाही तर त्यांना यावर उपाय काय करायचे, हेही सापडणार नाही.किमान जनतेच्या भल्यासाठी तरी मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहून काेराेनासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांकडे गांभीर्याने पाहावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला.
    यावेळी भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, भाजपा महानगर अध्यक्ष गिरीश पालवे, महापाैर सतीश कुलकर्णी, आमदार सीमा हिरे, आमदार राहूल ढिकले, भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार आदी उपस्थित हाेते.