सेना-भाजपा वादामुळे नाशिक शहरात तणाव; सेना कार्यालयावर दगडफेक करण्याचा भाजपाचा प्रयत्न उधळला

केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर नारायण राणेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर अत्यंत टाेकाची टीका करण्यास सुरूवात झाली. जन अाशीर्वाद यात्रेदरम्यान मात्र त्यांची जीभ अधिकच घसरल्याने शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली असून, नाशिक येथे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पाेिलसांत नारायण राणेंविराेधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस अायुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणेंच्या अटकेचे अादेश काढले.

  नाशिक : केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर नारायण राणेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर अत्यंत टाेकाची टीका करण्यास सुरूवात झाली. जन अाशीर्वाद यात्रेदरम्यान मात्र त्यांची जीभ अधिकच घसरल्याने शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली असून, नाशिक येथे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पाेिलसांत नारायण राणेंविराेधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस अायुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणेंच्या अटकेचे अादेश काढले. त्यानंतर गुन्हे शाखेचे पाेलीस उपायुक्त संजय बाेरकुंड यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिकचे पाेलीस पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले.

  दरम्यान, आज सकाळी शिवसैनिकांनी वसंत स्मृती या भाजपा कार्यालयात ताेडफाेड करून नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले आहे. शिवसेना आणि भाजप कार्यालय परिसरात काेणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जशास तसे उत्तर, आशी संतप्त प्रपतिक्रीया आ. फरांदे यांनी दिली.

  या प्रकारानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक घेऊन या घटनेचा निषेध केला असून, नाशकात गुन्हा दाखल केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा अाराेप करत अामदार देवयानी फरांदे यांनी पाेिलस प्रशासनावर अागपाखड केली. यावेळी पाेिलस अायुक्तांना िनवेदन देऊन ताेडफाेड करणाऱ्या कार्यकर्त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली. गुन्ह्याची नोंद नाशिकमध्ये न करता जर कोकणात केली असती तर नाशिकमध्ये ही परिस्थिती ओढवली नसती. तसेच सत्ताधारी शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. जे कुणी हल्ले करत आहेत त्यांना तातडीने अटक करा. शिवसेनेचेच कार्यकर्ते कार्यालयावर हल्ला करत आहेत. ज्या तत्परतेने तुम्ही गुन्हा नोंदवला त्या तत्परतेने तुम्ही त्यांना अटक करत नाही. हे सर्व संशयास्पद असल्याचा अाराेपही आमदार देवयानी फरांदे यांनी यांनी केला अाहे. सेनेच्या कार्यालयावर धाड टाका तिथे नक्कीच दगड, काठ्या सापडतील. 24 तासात हल्लेखोरांना अटक होऊन जर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ असेही, आमदार फरांदे यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे.

  सेना कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न उधळला

  दरम्यान, शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर भाजपा कार्यकर्तेही अाक्रमक झाले असून, त्यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शािलमार येथील शिवसेना कार्यालयाकडे येण्याचा प्रयत्न केलाा. मात्र पाेलीस आणि शिवसैनिकलांनी भाजपा कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. यावेळी भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यात काही कार्यकर्त्यांना दगड लागल्याचे वृत्त आहे. दाेन्ही बाजूंनी हाेत असलेल्या घाेषणाबाजीने परिसरातील वातावरणात तणाव निर्माण झाला हाेता. या वादामुळे परिसरातील व्यावसाियकांना अापली दुकाने बंद करावी लागली. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी शिवसैनिकांना शिविगाळ केल्याचा अाराेप सेनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात अाला.

  राणेंचा पुतळा जाळला

  शिवसेना कार्यालयाबाहेर जमा झालेल्या असंख्य शिवसैिनकांमुळे भाजपा कार्यकर्त्यांना शिवसेना कार्यालयापर्यंत पाेहाेचता अाले नाही. त्यानंतर िशवसेना कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्याविराेधात घाेषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी िशवसेनेचे सर्व पदाधिकारी उपसि्थत हाेते.

  केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर नारायण राणेंचा संयम सुटला असून, मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीबाबत काय बाेलावे, याचे भानही त्यांना रािहलेले नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पाेलीस आयुक्तांनी आमच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. असं िशवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले.