road accident

सविस्तर वृत्त असे की मंगळवारी रात्री हा अपघात झाला. तीन मित्र एका दुचाकी वरून फिरायला निघाले होते. फिरताना त्यांनी काही फोटो ही काढले. व आपल्या मोबाईल स्टेटस वरही फिरण्याचे फोटो टाकले. लाँग ड्राइव्ह विथ ब्रदर. असे रमत गमत फिरत असतांना अचानक या तिघांवर काळाने घाला घातला.

दिंडोरी : दिंडोरी (Dindori) तालुक्यातील नाशिक पेठ महामार्गावर उमराळे गावाजवळील कन्हैया धाब्याजवळ भीषण अपघात (Terrible accident) होऊन त्यात तिघा जीवलग मित्रांचा दुर्देवी मृत्यू (Death) झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की मंगळवारी रात्री हा अपघात झाला. तीन मित्र एका दुचाकी वरून फिरायला निघाले होते. फिरताना त्यांनी काही फोटो ही काढले. व आपल्या मोबाईल स्टेटस वरही फिरण्याचे फोटो टाकले. लाँग ड्राइव्ह विथ ब्रदर. असे रमत गमत फिरत असतांना अचानक या तिघांवर काळाने घाला घातला. हा अपघात एवढा भयानक होता की अपघात पाहिल्यानंतर मदत करणारे सुध्दा हादरून गेले होते.

हा अपघात स्कुटी गाडी व पिकअप समोरासमोर आदळल्याने झाला आहे. सदर अपघातात तीन जीवलग मित्र अनुक्रमे रोहित शार्दूल रा.दिवा मुंबई, निशांत मोहिते रा.पंचवटी नाशिक, अनिकेत मेहरा रा.अवनखेड हे तिघे युवक जागीच ठार झाले. दिंडोरी पोलीसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.