हद्दच झाली ! चक्क चाेरट्यांचे पाेलिसांनाच आव्हान

लासलगाव येथे हत्यारांचा धाक दाखवून पाच लाखांचे साेने पळविले

लासलगाव : सोनसाखळी चोरीची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी येथील गोविंद नगर मध्ये मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तीन ते चार जणांच्या टोळक्याने सुरगाणा येथे शिक्षक पतसंस्थेत क्लार्क म्हणून कामाला असलेले प्रमोद गिरीगोसावी यांच्या घराचा कडी कोंडा तोडत घरात प्रवेश करून पत्नीला आणि मुलीला धारदार हत्यारांचा धाक दाखवून अंदाजे पाच लाख रुपयांचे दहा ते अकरा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडल्याने लासलगाव येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे मध्यंतरी थांबलेल्या चोऱ्यांचे सत्र पुन्हा एकदा सुरू झाल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

येथील गोविंद नगर परिसरात राहत असलेले प्रमोद रतन गिरीगोसावी हे शिक्षक पंतसंस्थेत सुरगाणा येथे कामाला असून आठवड्यातून दोन वेळा लासलगावी गोविंद नगर येथे आपल्या घरी येत असल्याने घरात त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा हे राहत असल्याचा फायदा घेत तीन ते चार जणांच्या टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास दोन वाजेच्या दरम्यान घरचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करतात प्रमोद यांच्या पत्नीला धारदार हत्यारांचा धाक दाखविला असता घरात सोन्याचे दागिने नसून बँकेत ठेवल्याचे सांगितले त्याच वेळी एका चोराने त्यांच्या दहा ते बारा वर्षाच्या मुलीला सोन्याचे दागिने कुठे आहे तू माझ्या बहिणीसारखी असून न दिल्यास जीवे ठार मारुन टाकू असा सज्जड दम भरल्यामुळे त्या चिमुकलीने घरातील १० ते ११ तोळ्याची सोन्याची पाच लाख रुपयांची दागिने चोरांना काढून देताच या चोरांनी दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली

या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या मदतीने तपास सुरू केला आहे मात्र शहरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरी, घरफोड्या, मोटर सायकल चोरी आणि आठवडे बाजाराच्या दिवशी मोबाईलच्या चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाढत्या चोरीचे सत्र थांबवण्याचे लासलगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान या चोरट्यांनी उभे केले