lasalgaon onion auction

देशातील कांदा टंचाई आणि बाजारभाव स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करुण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्कस्तानमधून ११० टन कांद्याची आयात केली आहे. तर आगामी काही दिवसांत केंद्र सरकार एक लाख मेट्रिक टन कांदा आयात करणार आहे.

लासलगाव : कांद्याला (onions ) जगभरात विशेष मागणी आहे. भारत हा जगातील ७०हून अधिक देशात कांदा निर्यात करत असतो. परंतु यंदा जगाला कांदा निर्यात (exporting onions) करणाऱ्या भारताला कांदा आयात ( import Onions) करण्याची वेळी आली आहे. देशातील कांदा टंचाई आणि बाजारभाव स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने कांदा आयात करुण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्कस्तानमधून ११० टन कांद्याची आयात केली आहे. तर आगामी काही दिवसांत केंद्र सरकार एक लाख मेट्रिक टन कांदा आयात करणार आहे.

यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादनावर तसेच इतर शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारपेठांत होणारी कांद्याची आवक घटली आहे. बाजारात कांद्याची कमतरता असल्यामुळे दिवसेंदिवस दर गगनाला भिडत आहेत. शहरातील काही भागांत कांद्यांचा भावाने १०० रुपयांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेचा विचार करुन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

किरकोळ बाजारात कांद्याचे प्रतिकिलोचे दर ६० ते ८० रुपयांवर गेल्यामुळे केंद्राने कांदा दरवाठ नियंत्रणात आणण्यासाठी कांदा आयातीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर इजिप्त, तुर्कस्तान, इराण येथून कांदा मागवण्यात आला असून मुंबईतील बंदरात या कांद्याची आवक झाली आहे. राज्यातील प्रमुख बाजारपेठमध्ये हा कांदा लवकरच येईल. त्यानंतर कांद्याचे स्थानिक बाजारपेठांमधील दर कमी होतील.