Instead of staying in power out of helplessness, Congress should get out of power; Radhakrishna Vikhe-Patil's beating

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वताेपरी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे भाेसलेंवर कुणी वैयकि्तक टीका केली तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, उगाचच कुणीही त्यांच्यावर टीका करण्याची आगळीक करू नये, असा इशारा मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिला.

  नाशिक : आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील ठाकरे सरकार मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडायचा असेल तर सर्व संघटना आणि नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येणे गरजेचे आहे. सद्यसि्थतीत २२-२३ संघटना यावर काम करत आहेत, या संघटना एकत्र आल्या तर सरकारला त्याची गंभीर दखल घेणे भाग पडेल. आरक्षणाबाबत आपण लवकरच छत्रपती संभाजीराजे भाेसले, विनायक मेटे यांच्याशी चर्चा करून एकाच व्यासपीठावर येण्याची विनंती करणार असल्याचेही भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे -पाटील यांनी स्पष्ट केले.

  सर्वाेच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात माेठा असंताेष आहे. आता आरक्षण मिळविण्यासाठी नक्की काय केले पािहजे, याबाबत मी सर्वांशी चर्चा करताे आहे. त्यासंदर्भात आज नाशिक येथे बैठक घेतली असून, या बैठकीचा अभिप्राय पक्षाला पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बाेलताना स्पष्ट केले.

  नाशिक येथे घेण्यात आलेल्या बैठकीला सर्व संघटनांना आमंत्रित करण्यात आले होते. सर्वांची मतंही जाणून घेण्यात आली. आरक्षणाची लढाई जिकांयची असेल तर सर्व संघटनांच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येणे आवश्यक आहे. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही माझी भूमिका मांडली आहे. राज्य सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. आपण आज किंवा उद्या संभाजीराजे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपली भूमिका ही समन्वयाची आहे. संभाजीराजे यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती आपण करु. सगळे एकत्र येऊन आठवड्याभरात बैठक घेऊ. कोणत्याही आंदोलनाचं नेतृत्व सामुदायिक असावं, असे विखे पाटील यावेळी म्हणाले. संभाजीराजे यांनी राज्यातील संघटनांच्या बैठकीला यावं, अशी विनंती आपण त्यांना करणार आहोत. समाजाचा दबाव वाढला की नेते मंडळी पुढे येतील, असा दावाही विखेंनी यावेळी केला. मोर्चाचे नेतृत्व कोणी करावे याबाबत विचारले असता ते म्हणाले की, व्यक्तिगत प्रतिष्ठेचा प्रश्न कोणाचाच नाही. आरक्षण मिळावे ही सर्वांची भूिमका आहे. याबाबत लवकरच सर्व संघटनांनी एकत्रित बैठक घेवून निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

  काॅंग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे
  राज्य शासनात विसंवाद दिसून येतो आहे. प्रत्येकजण आपली वेगळी भूमिका मांडतो अाहे. आता काँग्रेस पक्ष इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करत आहे. तुम्ही राज्यात ज्या सरकारमध्ये सत्तेत आहात त्या सरकारने इंधनावरील कर जरी कमी केले तरी आपल्याला यश येईल, असा टोला त्यांनी लगावला. प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवणार असाल तर मग सत्तेतून बाजूला व्हा असे आव्हानच त्यांनी दिले.

  राजेंवर टीका केल्यास चाेख प्रत्यूत्तर : गायकर
  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वताेपरी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती संभाजीराजे भाेसलेंवर कुणी वैयकि्तक टीका केली तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, उगाचच कुणीही त्यांच्यावर टीका करण्याची आगळीक करू नये, असा इशारा मराठा क्रांती माेर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी याेग्य पद्धतीने छत्रपती संभाजी राजे प्रयत्न करत आहेत. काेराेनाकाळात समाजबांधवांचा जीव धाेक्यात घालून रस्त्यावर उतरणे याेग्य नाही, ही भूिमकाही याेग्य आहे. सकल मराठा समाज राजेंच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. राजे सांगतील त्याच पद्धतीने यापुढे मराठा आरक्षणाची दिशा ठरेल, असेही यावेळी गायकर यांनी स्पष्ट केले.