ट्रॅव्हल बसची रिक्षाला धडक ; रिक्षाचालक ठार

रविवारी पहाटे सुमारास अनिल बाळू ठाकरे  हा रिक्षा क्रमांक एम एच १५ एफ.यु.७२७६  घेऊन बिटको पाईंट कडून उड्डाणपूला खालू जेलरोड कडे  जात असताना  दत्त मंदिर बाजू कडून  येणाऱ्या  ट्रॅव्हल बस क्रमांक एम एच ०४  जी.पी.०१४४ चालकाने रिक्षा जोरात धडक दिली व अपघात झाला.

    नाशिक रोड : नाशिक रोड पोलीस हद्दीतील बिटको  चौकात ट्रॅव्हल बसने  रिक्षा ला धडक दिल्याने यातील चालक गंभीर जखमी होऊन ठार झाला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बस चालकास अटक करण्यात आली आहे.

    रविवारी पहाटे सुमारास अनिल बाळू ठाकरे  हा रिक्षा क्रमांक एम एच १५ एफ.यु.७२७६  घेऊन बिटको पाईंट कडून उड्डाणपूला खालू जेलरोड कडे  जात असताना  दत्त मंदिर बाजू कडून  येणाऱ्या  ट्रॅव्हल बस क्रमांक एम एच ०४  जी.पी.०१४४ चालकाने रिक्षा जोरात धडक दिली व अपघात झाला. त्यामुळे रिक्षाचालक रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला होता.त्याला  उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले.  अनिल ठाकरे यांस डॉक्टरांनी मयत घोषित केले. अपघात मध्ये रिक्षा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी विजय ठाकरे यांच्या तक्रार नुसार ट्व्हल्स बस चालक हसन हूसैन शेख याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बस ही ताब्यात घेतली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बिजली यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक माळी करत आहेत.