बागलाणच्या ‍’या’ पुढार्‍यांची अस्तित्वाची लढाई 

सटाणा : बागलाण तालुक्यात सध्या गावगाड्याच राजकारण तापले आहे.तालुक्याच्या ३१ ग्रामपंचायतींच्या ५४० जागांसाठी आज गुरुवारी (दि. १५) निवडणूक होत आहे.आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रतिनिधित्व करण्यासाठी ग्रामपंचायतीमधून निवडून येणे आवश्यक असल्यामुळे बहुतांश ठिकाणी तरुणांनी प्रस्थापितांच्या नांग्या ठेचण्यासाठी कंबर कसली आहे.तर प्रस्थापितांनी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच अस्रांचा वापर करून प्रतिष्ठा पणाला लावल्याने या निवडणूकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

बागलाणच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या अनेक बड्या ग्रामपंचायतींमध्ये रणसंग्राम सुरू आहे.तालुक्याच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपली प्रतिष्टा पणाला लावल्याने लखमापूर,नामपूर, सोमपूर, ब्राम्हणगाव, ताहाराबाद,कंधाने, उत्राणे, तरसाळी येथील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. लखमापूरमध्ये मविप्रचे माजी उपसभापती नानाजी दळवी, जिल्हा परिषद सदस्य पप्पुतात्या बच्छाव विरुध्द जिल्हा परिषद सदस्या लता बच्छाव यांचे पती डॉ. विलास बच्छाव या दोन गटा भोवतीच पारंपारिक लढत रंगली आहे. नानाजी दळवी यांनी स्वतः रणांगणात उतरवून बच्छाव गटासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे येथील निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

ब्राम्हणगाव येथे मात्र घरातच महाभारत सुरू झाले असून मविप्रचे उपसभापती राघोनाना अहिरे यांच्या विरुद्ध थेट त्यांचे थोरले बंधु जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष यशवंतबापू अहिरे यांनी पेनल उभे करून आव्हान दिले आहे. त्यामुळे येथील लढत लक्षवेधी ठरली आहे. ताहाराबाद मध्ये अनेक मात्तबर आखाड्यात उतरल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुभाष नंदन यांच्या पत्नी प्रमिला नंदन, भाजपचे प्रदीप कांकरीया, काॅंग्रेसचे सचिन कोठावदे यांच्या सौभाग्यवती निवडणूक रिंगणात आहेत. वसाकाचे माजी उपाध्यक्ष सीताराम साळवे यांच्याविरुद्ध त्यांचा पुतण्या संदीप साळवे यांनी दंड थोपटले आहेत.
येथे रंगणार लढती सोमपूर, निताने, कुपखेडा, द्याने, ब्राम्हणगाव, करंजाड, कोट्बेल, पिंपळदर, कंधाने, उत्राणे, कोळीपाडा, देवळाने, ताहाराबाद, लखमापूर, तरसाळी, ठेंगोडा, नामपूर.