देवगाव फाटा येथील विहिरीत आढळला युवक आणि युवतीचा मृतदेह

भरवसफाटा कोळपेवाडी राज्य महामार्ग क्र.७ देवगाव फाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट नं.१८६ या विहीरीत काळा टॉप,पिवळी लेगिन्स ,उजव्या हातात घड्याळ,डाव्या हातात कडे,पायात बाजारातील तोरड्या,गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील २२ ते २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.

    लासलगाव  : निफाड तालुक्यातील देवगाव फाट्यानजीक एक तरुण व तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    याबाबत सविस्तर वृत्त असे की,भरवसफाटा कोळपेवाडी राज्य महामार्ग क्र.७ देवगाव फाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट नं.१८६ या विहीरीत काळा टॉप,पिवळी लेगिन्स ,उजव्या हातात घड्याळ,डाव्या हातात कडे,पायात बाजारातील तोरड्या,गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील २२ ते २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे.

    दरम्यान, दि २९ रोजी सायंकाळी ७.५० च्या दरम्यान आणखी एक तरुणाचा मृतदेह फुगून वर आला आहे. याबाबत लासलगाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.या
    घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पो.कॉ.डी.के.ठोंबरे,डी.डी.पानसरे,पो.हवा.कोते,किशोर वाणी,मस्तागर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.