टाेलचा झाेल ; पत्रकारांनाही ठेवले दूर, तहसील प्रशासन-सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बंद दाराआड चर्चा

इगतपुरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांना इगतपुरी येथे दिवसात तीन ते चार वेळेस यावे लागते.त्यामुळे तहसिल विभागात सर्व साधारण नागरिकांचा टोल प्रशासना विरोधात निषेध सुरू होता. आज घोटी टोल प्रश्नी आज सर्वपक्षीय नेत्यांनी इगतपुरी येथे तहसिल कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत स्थानिक पत्रकारांना आत येण्यास दरवाजाच बंद होता.

    इगतपुरी : घोटी टोल नाका प्रशासन व सर्वपक्षीय पदाधिकारी यांची बैठक आज इगतपुरी तहसिल कार्यलयात पार पडली. बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत पत्रकारांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वपक्षीय नेते व प्रशासन यांच्यात टोल नाक्याबाबत काय निर्णय झाला हा देखील चर्चेचा विषय आहे.

    इगतपुरी तालुक्यातील स्थानिक नागरिकांना इगतपुरी येथे दिवसात तीन ते चार वेळेस यावे लागते.त्यामुळे तहसिल विभागात सर्व साधारण नागरिकांचा टोल प्रशासना विरोधात निषेध सुरू होता. आज घोटी टोल प्रश्नी आज सर्वपक्षीय नेत्यांनी इगतपुरी येथे तहसिल कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत स्थानिक पत्रकारांना आत येण्यास दरवाजाच बंद होता.

    त्यामुळे तहसिल प्रशासन व सर्व पक्षीय नेते यांच्यात काय निर्णय झाला ते अद्याप तरी समजले नाही. यावेळी बाहेर उभे असलेल्या नागरिकांनी देखील आत झालेल्या बैठकीची नाराजी व्यक्त केली. बंद दरवाजा आड झालेली चर्चा व त्याबाबतच्या तपशील माध्यमांपासून दूर का ठेवण्यात आला. या बैठकीत प्रशासन व लोकप्रतिनिधींना माध्यमांचे वावडे का? असा सवाल सर्वत्र व्यक्त होत आहे. या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने पत्रकार संघाच्या वतीने यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.