राज्याभिषेक साेहळा हाेणार ऐतिहासिक; रायगडावर जाण्यासाठी गुप्त बैठकांचा धडाका

प्रत्येकाने काेराेेना चाचणी करून बाधीत नसल्याची खाञी करून घ्यावी, एका वाहनात चार व्यक्ती, सोबत मास्क, सॅनिटायझर, दोन दिवस पुरेल इतका कच्चा, पक्का शिधा, पिण्याचे पाणी बाळगण्याच्या सूचनाही दिल्या जात आहेत. एकूणच आपले हक्क मिळवतांना शासकीय अटी शर्तींचा कुठेही भंग होणार नाही, महामारीचा प्रसार होण्यास आपण निमित्त ठरणार नाही, याविषयी सतर्कता बाळगण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. एकूणच बैठकांना प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही मराठा समाजाने रायगडावर जाण्याचा निर्धार केल्याने यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

    सिडको : सर्वाेच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर खा. संभाजीराजे भाेसले यांनी वेगवेगळ्या माध्यमातून हा तिढा साेडवण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही यावर ठाेस असा उपाय निघत नसल्याने येत्या ५ जूनला रायगडावर कूच करण्याचा आदेश त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका सुरू असून, जाण्याचे आणि इतर सूक्ष्म नियाेजन केले जात आहे.

    शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा ‘याच देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी जिल्ह्यातून हजारो वाहनांमधून शिवभक्त ५ जूनला दुपारी रायगडाकडे कुच करणार असल्याचे समजते. त्यादृष्टीने कार्यकर्ते, पदाधिकारी गुप्त बैठका घेऊन मार्गदर्शन करत आहेत.

    रायगडावरून एल्गार
    मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला दिशा देण्यासाठी छञपतींचे वंशज खा. संभाजी राजे भोसले सक्रीय झाले असून राज्य सरकारकारला केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा लक्षवेधी ठरला आहे. येत्या दोन दिवसात मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या समारंभानंतर छञपती खा. संभाजीराजे भोसले रायगडावरून मराठा एल्गारची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शासन प्रशासनाकडून मराठा समाजाच्या बैठकांना प्रतिबंध लावला जात आहे.

    दुसऱ्या फळीतील नेत्यांना जबाबदारी
    नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाच्या बैठकीलाही प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ठिकठिकाणी गुप्त बैठका घेऊन रायगड वारीचे नियोजन आखले जात आहे. छञपती खा. संभाजी राजे भोसले यांच्या निर्देशानुसार मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, राजू देसले, अॅड. शिवाजी सहाणे, तुषार जगताप, गणेश कदम, शिवा तेलंग संदीप शितोळे पूजा धुमाळ, माधवी पाटील यांच्यासारखे आजवर पहिल्या फळीत काम करणारे समन्वयक यावेळी भूिमगत बैठकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. या बैठकांमध्ये रायगडावर जाण्यासाठीचे नियोजन करण्याची जबाबदारी दुसऱ्या फळीवर सोपविण्यात आली आहे. वेळोवेळी मिळत असलेल्या सूचनांच्या आधारावर अत्यंत गुप्त पध्दतीने हे नियोजन सुरू असून ५ जूनला रायगडाकडे प्रस्थान करण्यापूर्वी शासनाची एसओपी पाळण्याची अट घालण्यात आली आहे.

    नियमांचे पालन करण्याच्या सूचना