पोलिसांच्या ताब्यातून गुन्हेगार फरार ; एका अधिकाऱ्यासह तीन कर्मचारी निलंबित

इगतपुरी पोलीस ठाण्यात ३० लाखाच्या नकली सोन्याच्या फसवणुकीचा आरोपी तपासासाठी रायगड जिल्हयातुन आणला होता.सदर आरोपीस गुजरातला तपासासाठी नेले असता प्रभुभाई गुलशन भाई सोलंकी, राहणार आजवारोड, बडोदरा, गुजरात हा आरोपी इगतपुरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्यात यशस्वी झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

    इगतपुरी : इगतपुरी पोलीस ठाण्याचे पथक एका ४२० प्रकारणाच्या शोधासाठी आरोपीला गुजरातला घेऊन गेले असता हा आरोपी पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पळाल्याची घटना दि.२८ रोजी घडल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका अधिकाऱ्यासह दोन पोलीस व एका महिला पोलीसाला निलंबित केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

    याबाबत प्राथमिक माहिती अशी की, इगतपुरी पोलीस ठाण्यात ३० लाखाच्या नकली सोन्याच्या फसवणुकीचा आरोपी तपासासाठी रायगड जिल्हयातुन आणला होता.सदर आरोपीस गुजरातला तपासासाठी नेले असता प्रभुभाई गुलशन भाई सोलंकी, राहणार आजवारोड, बडोदरा, गुजरात हा आरोपी इगतपुरी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्यात यशस्वी झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

    सदर आरोपीला पोलीस उपनिरीक्षक शरद सोनवणे, पोलीस हवालदार अशोक भाबड, प्रविण सहारे, महीला पोलीस मनिषा कुजोरे हे तपासासाठी गुजरात येथे घेऊन गेले असता ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला.