प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गेल्या महिनाभरापासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाने आज निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्याने आवाहन करूनदेखील नियमांचे पालन होताना दिसत नाही, तसेच बाजारपेठांमधील गर्दी कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक बोलावली होती.

  नाशिक (Nashik). गेल्या महिनाभरापासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाने आज निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. सातत्याने आवाहन करूनदेखील नियमांचे पालन होताना दिसत नाही, तसेच बाजारपेठांमधील गर्दी कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आढावा घेतला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध मांडले.

  हा घेतला निर्णय
  त्यानुसार, १० तारखेपासून जिल्ह्यात सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, दुधपुरवठा धारक, वर्तमानपत्र विक्रेते यांचा अपवाद राहणार आहे.

  हे आहेत निर्णय
  शनिवार, रविवारी सर्व धार्मिक स्थळे बंद असतील. जीम, मैदाने, स्विमिंग टँक केवळ व्यक्तिगत सरावापुरते वापरता येतील. हॉटेल, परमिट रुम, बार यांना सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत निम्म्या क्षमतेने सुरू राहतील. जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद राहतील. सर्व कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालय बंद राहतील. सर्व दुकाने सायंकाळी 7 नंतर बंद असतील.

  विवाह सोहळ्यांबाबत १५ मार्चपर्यंत असलेले लग्न नियम पाळून सुरू राहतील, त्यानंतर बंदी असेल. त्यानंतर जर विवाह सोहळे करावयाचे असतील तर शासनाचे निर्बंध पाळून घरगुती समारंभात करता येईल. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे देखील सकाळी 7 ते सायंकाळी 7 याच वेळेत उघडे असतील.

  प्रशासन करणार जनजागृती
  नागरिकांमध्ये कोरोना बाबत असलेले शासकीय निकष पाळण्याबाबत सर्व शासकीय आस्थापना प्रयत्न करणार आहे. ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.