कोटमगावची प्रसिद्ध यात्रा या वर्षी कोरोनामुळे बंद रहाणार

प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

येवला : नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या येवला तालुक्यातील कोटमगाव येथील नऊ दिवसीय यात्रोत्सव यावर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बंद रहाणार आहे इतिहासात पहिल्यांदाच यात्रोत्सव हा प्रसिध्द यात्रोत्सव बंद रहाणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांचे आराध्य दैवत समजली जाणारी श्री महाकाली,श्री महालक्ष्मी,श्री महासरस्वती म्हणजेच कोटमगावची जगदंबा माता नवरोत्सवाच्या नऊ दिवसात हजारावर भाविक येथे घटी बसतात.नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द करावा लागला असला तरी ट्रस्टमार्फत ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध दिली जाणार आहे.

१७ ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने बैठक बोलावण्यात आली होती प्रशासकीय अधिकारी देवस्थान ट्रस्ट सदस्य ,ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते या बैठकीत चालू वर्षीची यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. प्रथेप्रमाणे देवीची विधिवत पूजा केली जाणार आहे या यात्रोत्सवात उत्तर महाराष्ट्रासह राज्यभरातील भाविक येत असल्याने यात्रेच्या नऊ दिवसात करोडो रुपयांची उलाढाल होत असते,यात्रेच्या माध्यमातून अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना रोजगार मिळत असतो. कोटमगाव यात्रेचे खास आकर्षण म्हणजे येथील हॉटेल्स व त्यामधील असणारी स्वच्छता देवीच्या दर्शनासाठी होणाऱ्या गर्दीमुळे यात्रा ही प्रसिद्ध आहे.यात्रेत मोठ्या प्रमाणात महिला घटी बसत असतात या महिलांची फराळाची व राहण्याची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत व देवस्थान तर्फे करण्यात येते.

यात्रेच्या काळात सकाळ व संध्याकाळी पाच जणांचा उपस्थितीत आरती केली जाणार आहे.भाविक दर्शनासाठी जेथून येतात ती दोन्ही प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात येणार आहे. गावातही प्रवेश दिला जाणार नाही या बैठकीला येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी,नायब तहसीलदार राऊत, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष राऊसाहेब कोटमे,विश्वस्त भाऊसाहेब आदमणे,रामचंद्र लहरे,माजी सरपंच शरद लहरे,नानासाहेब लहरे,सतीश कोटमे,व्यवस्थापक राजेंद्र कोटमे,
पोलिस पाटील बाबासाहेब लव्हाळे,आप्पासाहेब चव्हाण,रोहित मढवई,इमाम काद्री,श्रावण ढमाले आदी उपस्थित होते.