नाशिककरांना भरली हुडहुडी; थंडीचा पारा १० अंशांवर घसरला

नाशिक : थंडीचा पारा १० अंशांवर घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. मागील पाच दिवसांपासून नाशिकच्या तापमानात पुन्हा घट होण्यास सुरूवात झाली आहे.

शनिवारी ११.१ तर रविवारी १०.१ अंश अशी किमान तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक शहर आणि निफाडच्या कुंदेवाडी येथे रविवारी किमान तापमानाचा पारा १० अंशांवर घसरला. यामुळे नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसाही वातावरणात गारवा जाणवत आहे.

दिवाळीच्या दरम्यान १२ नोव्हेंबरला या हंगामातील नीचांकी तापमान नोंदवले गेले होते.  तापमानात वाढ होत थंडी गायब झाली होती. मागील पाच ते सहा दिवसांपासून नाशिकमध्ये पुन्हा थंडीचा जोर वाढला आहे.