दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त ; वस्तू खरेदी करण्यासाठी बनावट नोटा वापरणाऱ्यांना बेड्या

हरिष वाल्मीक गुजर (वय २९) राहणार विंचूर रोड तालुका येवला व बाबासाहेब भास्कर शहीद (३८, रा. चिंचोली खुर्द, तालुका येवला) या दोघांनी संगनमताने बनावट चलनी नोटा खऱ्या असल्याचे भासवून वस्तू खरेदी करताना त्यांचा वापर केला.

  नाशिक : भारतीय चलनातील बनावट नोटा माहिती असूनही वस्तू खरेदी करताना त्याचा वापर करताना आढळून आल्याने सुरगाणा पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून स्कोडा कारसह दोन लाख २८ हजार ९०० रुपये जप्त करण्यात आले आहेत या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  या घटनेची सुरगाणा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  हरिष वाल्मीक गुजर (वय २९) राहणार विंचूर रोड तालुका येवला व बाबासाहेब भास्कर शहीद (३८, रा. चिंचोली खुर्द, तालुका येवला) या दोघांनी संगनमताने बनावट चलनी नोटा खऱ्या असल्याचे भासवून वस्तू खरेदी करताना त्यांचा वापर केला.

  या नाेटा जप्त
  हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांच्याकडून एकोणावीस हजार चारशे रुपये रोख रक्कम त्यात शंभर रुपये दराच्या १९४ भारतीय चलनी नोटा पाचशे रुपये रोख रक्कम त्यात पाचशे रुपये दराची एक बनावट भारतीय चलनी नोट अशा एकूण १९ हजार ९०० रुपये किमतीच्या बनावट भारतीय चलनी नोटा त्या बनावट असल्याची माहिती असूनही वस्तू खरेदी करतांना त्यांचा वापर करून स्वतःच्या कपड्यात बाळगल्या याप्रकरणी या दोघांविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडके अधिक तपास करीत आहे.

  या बनावट नोटाप्रकरणी गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता दोन स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या आहे. त्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आल्या असून, त्या टीममार्फत संशयितांचा शोध घेऊन आणखी काही आरोपी लवकरच हाती लागण्याची शक्यता आहे.

  - सचिन पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक