बिबट्या अखेर जेरबंद अनेक दिवसापासून देत होता हुलकावणी 

बिबट्याला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चवताळलेल्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर पिंजरा गाडीला लावून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात सोडून देण्यासाठी घेवून गेले.

    नाशिक: बेलगाव कुऱ्हे येथील पोल्ट्री जवळ दुसऱ्यांदा बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश, येथील पोल्ट्री व्यावसायिक संजय गुळवे यांच्या पोल्ट्री शेडजवळ काल वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूला शेळी बांधण्यात आली होती. पहाटे चार वाजताच्या निर्गव शांततेत बिबट्या पिंजऱ्यात अडकल्या नंतर डरकाळ्यांनी तेथील कामगारांना जग आली आणि पाहिल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड करीत होता.

    पिंजऱ्याच्या लोखंडी जाळ्यांना जोरदार धडका देवून अक्षरशः बिबट्या रक्तबंबाळ झाला होता. क्षणार्धात बातमी कळताच बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे वनपाल शैलेंद्र झुटे आपल्या रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चवताळलेल्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्यात आले त्यानंतर पिंजरा गाडीला लावून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात सोडून देण्यासाठी घेवून गेले.