देवळा मुद्रांक छेडछाड प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर गजाआड

बनावट मुद्रांक बनवून खोट्या दस्तऐवजाद्वारे मेशी येथील शेतजमीन परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करून देण्यात महत्वाची भूमिका निभावणारा या कटातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू वाघ हा एक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.त्याच्या जामीन अर्जावर काल दि.१६ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती तेथे जामीन न मिळाल्याने अखेर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला असावा अशी शक्यता उपस्थित केली जात आहे.

    देवळा : मुद्रांकात छेडछाड करून परस्पर शेतजमीन हडप करण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू वाघ देवळा पोलिसांच्या ताब्यात आला असून यात अजून किती मासे गळाला लागतील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

    बनावट मुद्रांक बनवून खोट्या दस्तऐवजाद्वारे मेशी येथील शेतजमीन परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करून देण्यात महत्वाची भूमिका निभावणारा या कटातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू वाघ हा एक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.त्याच्या जामीन अर्जावर काल दि.१६ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती तेथे जामीन न मिळाल्याने अखेर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला असावा अशी शक्यता उपस्थित केली जात आहे.मुद्रांक विक्रेता पोलिसांच्या ताब्यात आल्याने त्याला दुय्यम निबंधक कार्यालयातून जुना मुद्रांक व खोट्या दस्ताची सत्यप्रत काढून देण्यास कुणी मदत केली तसेच मुद्रांकात छेडछाड करताना कुणी मदत केली असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित असल्याने त्याचा शोध लागण्याची शक्यता आहे तसेच बनावट दस्त व सत्यप्रत याद्वारे शेतजमीन परस्पर हडप करण्याच्या प्रकरणात कुठे -कुठे आर्थिक देवाणघेवाण झाली याचाही उलगडा होणार आहे.