महिला पोलिसाच्या खुनाला आत्महत्या दाखवले; परमबीरसिंगांवर आणखी एक गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यावर नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत. ठाणे पोलिस आयुक्त असताना महिला पोलिस शिपाई सुभद्रा पवार हिचा खून झालेला असताना आत्महत्या केल्याचे भासवून खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप नाशिक ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक शामकुमार निपुंगे यांनी केला आहे.

    नाशिक : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यावर नाशिकच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत. ठाणे पोलिस आयुक्त असताना महिला पोलिस शिपाई सुभद्रा पवार हिचा खून झालेला असताना आत्महत्या केल्याचे भासवून खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा आरोप नाशिक ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक शामकुमार निपुंगे यांनी केला आहे.

    तत्कालीन आयुक्त परमबीरसिंग, उपायुक्त डॉ. स्वामी यांच्यासह अॅट्रासिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आडगाव पोलिस ठाण्यात 22 पानी तक्रार दिली आहे. निपुंगे यांनी 14 जून रोजी जर तक्रार दिली आहे तर आतापर्यंत गुन्हा का दाखल केला गेला नाही? असा सवाल विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ यांनी नाशिक पोलिसांना केला आहे. तसेच तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.