प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

इंधन दरवाढीने जनतेचे कंबरडे मोडले असतानाच आता कांदाही लोकांना रडवू लागला आहे. महिनाभरात कांद्याच्या किंमतीत 14 रुपये वाढ झाली आहे. आशियातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या लासलगाव येथे शनिवारी 4200 रुपये प्रति क्विंटल कांद्याचा दर होता.

    नाशिक (Nashik).  इंधन दरवाढीने जनतेचे कंबरडे मोडले असतानाच आता कांदाही लोकांना रडवू लागला आहे. महिनाभरात कांद्याच्या किंमतीत 14 रुपये वाढ झाली आहे. आशियातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या लासलगाव येथे शनिवारी 4200 रुपये प्रति क्विंटल कांद्याचा दर होता. अवकाळी पावसामुळे कांद्याची आवक घटली असल्याने दरातही वाढ झाली आहे. बाजारात आवक असली तरी ती कमी प्रमाणात आहे.

    तथापि, मार्च महिन्यात मात्र पुरेसा पुरवठा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 19 फेब्रुवारी रोजी कांद्याचा दर 50 रुपये किलो होता जो एक महिन्यापूर्वी याच समान कालावधीत 36 रुपये किलो होता, अशी माहिती जाणकारांनी दिली.

    अवकाळी पावसामुळे कांदा पिकाला फटका बसल्याची माहिती लासलगाव बाजाराचे सचिव नरेंद्र वाधवाने यांनी दिली. यामुळेच पुरवठ्याअभावी दरवाढही झाली असल्याचे ते म्हणाले. देशभराच्या तुलनेत 28.32 टक्के कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते, अशी माहितीही त्यांनी दिली.