कोरोनापासून अद्याप दूर असलेले एकमेव गाव; निफाड तालुक्यातील या गावाच्या पॅटर्नचा आदर्श सर्वांनी घ्यावा

सर्वच गावामध्ये कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यामध्ये निफाड तालुकाही कोरोनाच्याआकडेवारीत अग्रेसर आहे. खेड्यापाड्यासहित सर्वच गावामध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणावर संक्रमित झाले आहे. अशातही तालुक्यात गोळेगाव  हे असे एकमेव गाव आहे की येथे  अद्यापपर्यंत गावकऱ्यांनी कोरोनाला गावात प्रवेश करू दिलेला नाही.

  निफाड : सर्वच गावामध्ये कोरोनाने थैमान घातले असून जिल्ह्यामध्ये निफाड तालुकाही कोरोनाच्याआकडेवारीत अग्रेसर आहे. खेड्यापाड्यासहित सर्वच गावामध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणावर संक्रमित झाले आहे. अशातही तालुक्यात गोळेगाव  हे असे एकमेव गाव आहे की येथे  अद्यापपर्यंत गावकऱ्यांनी कोरोनाला गावात प्रवेश करू दिलेला नाही.

  निफाड तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे व गेल्या महिन्यापासून तर तिच्यात मोठ्या प्रमाणावर वाढ ही झालेली आहे. आतापर्यंत एकूण सुमारे १३ हजार रुग्ण बाधित झालेले आहे.

  दररोज अडीशे तीनशे रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण आहे. काेराेनाने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने तालुक्यामध्ये भीती युक्त वातावरण आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेकांनी घरात बसणं पसंत केलेले आहे जे रुग्ण बाधित झाले आहे त्यांचेवर  पिंपळगाव, लासलगाव व नव्यानेच सुरू झालेल्या निफाड येथील कोविड सेंटरमध्ये  रुग्णांवर उपचार  होत आहे .रुग्ण संख्या जास्त असल्याने येथील बेड अपुरे पडत असल्याने अनेक रुग्णांना  खाजगी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागत आहे अनेक हॉस्पिटल रुग्णांकडून अवास्तव  बिले करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.

  सरकारी यंत्रणा मात्र तोंडावर बोट ठेऊन गप्प बसण्याच्या भूमिकेत आहे. परिस्थिती बिकट असल्याने तालुक्यांमध्ये मोठ्या गावांमध्ये व काही छोट्या गावांमध्ये लोक स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूचे पालन करीत व्यवहार बंद ठेवून कोरोनाला रोखण्यास मदत करत आहे. त्यामुळे काही दिवसात संक्रमण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशा परिस्थिती मध्ये निफाड तालुक्यातील अस एक गाव आहे तिथे अद्यापपर्यंत कोरोनाचा शिरकाव झालेला नाही ते गाव म्हणजे तालुक्याच्या पूर्वेला असलेल गोळेगाव.

  या गावात सुरूवाती पासून ते आतापर्यंत गावातील नागरिकांनी शिस्तीचा व स्वच्छतेचे पालन केल्यामुळे येथील एकही नागरिक अजून  संक्रमित झालेला नाही व या गावात कोरोनाला लोकांनी कोरोनाला प्रवेश करू दिलेला नाही.

  तालुक्यात कोरोना संक्रमणाची संख्या जास्त असल्याने अनेक छोटे छोटे गावे ही यातून सुटलेले नाही. मात्र गोळेगावकर यांनी दाखवलेला संयम हा वाखाणण्याजोगा असून या गावातील एकाही  नागरिकाला कोरोणाने संकर्मित झालेला नसल्याने येथील लोक समाधान व्यक्त करत आहे. याचबरोबर तालुक्‍यातील सहा अशी गावे आहेत की येथे कोरोणा संक्रमित रुग्णांची संख्या दहाच्या आत असून या गावांमध्ये अजून एकाही व्यक्तीचा कोरोनाने  मृत्यू झालेला नाही त्यामध्ये दहेगाव, श्रीरामपूर, ब्राह्मणगाव वनस, हनुमान नगर, मानोरी खुर्द व सुंदरपूर या गावांचा समावेश असल्याचे निफाड तालुका कोविड संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे, यांनी सांगितले आहे.