वाढत्या रुग्णसंख्येचा धसका ; पंचवटीतील काेविड सेंटर सुरू करा : आमदार ढिकले

शहरात सध्या रोजच सरासरी दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा शहरातील सर्व भागात प्रसार होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या जेव्हढ्या चाचण्या होतात, त्यातील चाळीस टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटीव्ह येत असल्याने महापालिकेने यापूर्वी सुरु केलेल्या कोविंड सेंटर पुन्हा सु स्तरावर आढावा घेतला जात आहे. शहरात सध्या शनिवारी व रविवारी लाकडाउन करण्यात येत आहे. विविध बंधने घालण्यात आली आहेत. त्यानंतरही नागरिक परेशी काळजी घेत नसल्याने शहरात लॉकडाउन होणार का हा सध्या चर्चेचा विचार आहे.

    नाशिक : कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी पंचवटी येथील काेविडकेअर सेंटर पुन्हा सुरु करावे, अशी मागणी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्र सादर केले आहे.

    नाशिक शहरात व पंचवटी परिसरात रोजच कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात मखमलाबाद, म्हसरूळ, आडगाव ही गावे तसेच पंचवटी विभागातील झोपडपट्टी आणि नवनवीन कॉलनी, असा मोठा परिसर आहे.

    गेल्यावर्षी या नागरिकांना एकमेव डॉ. पंजाबराव देशमुख निवासी वसतिगृह येथे मेरी कोविड केअर सेंटर होते. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने हे कोविड केअर सेंटर बंद केले आहे. मात्र, आता पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले असून, पंचवटी परिसरात सध्या कोरोना केअर सेंटर नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे ढिकले यांनी पत्रात म्हटले आहे. सध्या रुग्णांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत असून, नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मेरी येथील कोविड केअर सेंटर व कोविड चाचण्या सेंटर कोविड संसर्ग असेपर्यंत सुरु करण्यात यावे, अशी मागणी विकले यांनी केली आहे.

    शहरात सध्या रोजच सरासरी दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्याचा शहरातील सर्व भागात प्रसार होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या जेव्हढ्या चाचण्या होतात, त्यातील चाळीस टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटीव्ह येत असल्याने महापालिकेने यापूर्वी सुरु केलेल्या कोविंड सेंटर पुन्हा सु स्तरावर आढावा घेतला जात आहे. शहरात सध्या शनिवारी व रविवारी लाकडाउन करण्यात येत आहे. विविध बंधने घालण्यात आली आहेत. त्यानंतरही नागरिक परेशी काळजी घेत नसल्याने शहरात लॉकडाउन होणार का हा सध्या चर्चेचा विचार आहे. त्यामुळे पंचवटी भागात गतवर्षीची स्थिती विचारात घेता कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी आमदार ढिकले यांनी केली आहे.

    सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, उपचार व तपासण्यासाठी पंचवटीतील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पंचवटीतील मेरी येथील कोरोना केअर सेंटर पूर्ववत करावे, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

    - ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.