स्लॅब काेसळून भगदाड पडले ; कंधाणेतील जलकुंभ बनला धोकादायक

जलकुंभाचे बांधकाम जून्या राहटीचे असल्याने जलकुंभावर वरती चढण्यास कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या टाकीच्या पाण्याच्या आत दडलंय काय? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. जलकुंभाची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होताे. जलकुंभाला बाहेरूनही अनेक ठिकाणी मोठमोठे भगदाड पडत असून, पाण्याला गळती लागली आहे.

  सटाणा :  कंधाणे ता. बागलाण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी 1972 साली बांधण्यात आलेला जलकुंभ जीर्ण झाला अाहे. या जलकुंभाचा स्लॅब ठिकठिकाणी कोसळत असून, ब-याच ठिकाणी भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही दुर्घटना घडल्यास परिसरातील ग्रामस्थांच्या जीविताला धाेेका निर्माण झाला अाहे. स्लॅब काेसळत असल्यामुळे जलकुंभाची अनेक दिवसांपासून साफ-सफाईदेखील करण्यात अाली नसल्याने ग्रामस्थांच्या अाराेेग्याचा प्रश्न निर्माण झाला अाहे. जलकुंभाच्या ठिकाणी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलकुंभ मंजूर करण्यात यावा, यासाठी स्थानिक प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे; पण संबधितांनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कंधाणेवासियांनी संताप व्यक्त केला अाहे.

  जलकुंभाचे बांधकाम जून्या राहटीचे असल्याने जलकुंभावर वरती चढण्यास कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या टाकीच्या पाण्याच्या आत दडलंय काय? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. जलकुंभाची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होताे. जलकुंभाला बाहेरूनही अनेक ठिकाणी मोठमोठे भगदाड पडत असून, पाण्याला गळती लागली आहे. जलकुंभ परिसरात नागरिक वस्ती अाहे. लहान मुले या ठिकाणी खेळत असतात, जवळच प्राथमिक शाळा असल्याने बरेच विद्यार्थी या जलकुंभ परिसरातून जा-ये करत असतात. त्यामुळे जलकुंभ कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. सरकारी यंत्रणेलाही याबाबतची कथा अनेक वेळा कथन केली गेली आहे. पण ‘सरकारी काम बारा महिने थांब’चा प्रत्यय येथील नागरिकांना येत आहे. या नवीन जलकुंभाचा प्रश्न लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चघळला जातो. निवडणूक संपली की संबधित लोकप्रतिनिधी व नागरिकांनाही याचा विसर पडतो.

  गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेला हा जलकुंभ जीर्ण झाला असून, त्याच्या जीर्णत्वामुळे ब-याच ठिकाणी त्याला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. पाणीटंचाईमुळे गावाला एका दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असून, लिकेचमुळे अजून कमी पाणीपुरवठा नागरिकांना होत आहे. जुन्या झालेल्या या जलकुंभामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

  - शशीकांत बिरारी, माजी उपसरपंच, कंधाणे

  “नवीन जलकुंभाचा प्रस्तावा पंचायत समितीकडे पाठवला असून, सर्व परिसि्थतीचे अवलोकनही संबधितांना कथन केले गेले आहे. परंतु अद्याप कोणाताही मंजूर आदेश प्राप्त झालेला नाही. जीर्ण बांधकामामुळे या जलकुंभाची अंतर्गत साफ-सफाई करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.”
  – सतीश मोरे, ग्रामसेवक, कंधाणे