अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता, तो मुख्यमंत्र्यांनी घातला; संजय राऊतांचा राणेंना टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात तीन मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या. एक अतिशहाणा निघाला. त्याने मोदीचा आदेश पाळला नाही. अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता. तो मुख्यमंत्र्यांनी घातला, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी नारायण राणेंना लागावला.

  नाशिक : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात तीन मंत्र्यांच्या यात्रा निघाल्या. एक अतिशहाणा निघाला. त्याने मोदीचा आदेश पाळला नाही. अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता. तो मुख्यमंत्र्यांनी घातला, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी नारायण राणेंना लागावला. संजय राऊत आज नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

  दरम्यान जिथे पोहोचायचा तिथे नाशिकचा आवाज पोहोचला. आजच्या वादात सत्यभामा गाडेकर असत्या, तर एखादा दगड जास्त पडला असता. मला अस वाटलं नाशिकला जावं. शेवटी अख्या देशात 8 दिवसांपासून फक्त नाशिकची चर्चा सुरू आहे. तुम्ही FIR केला तेव्हा मी भुवणेशवरला होतो. तिथून परत आलो, असं राऊत म्हणाले.

  येड्यांची जत्रा निघाली – राऊत

  दुसऱ्या दिवशी नाशिकने जे वादळ उठवलं ते अद्याप संपलेलं नाही. हे (मीडिया) समोर आहे. त्यामुळे कानफटात वाजवन्याची भीती वाटते. नाही तर गुन्हा दाखल होतो. नारायण राणेंनी सवय लावली आहे. अनेक ठिकाणी जण आशीर्वाद यात्रा निघाली. काही ठिकाणी येड्यांची जत्रा निघाली, असा जोरदार हल्लाही त्यांनी चढवला.

  पण एक अतिशहाणा, मोदींचा आदेश पाळत नाही

  सगळ्यांनी यात्रा केली. पण सेनेवर कोणी वक्तव्य केली नाही. मोदींनी मंत्र्यांना यात्रेसाठी काय सांगितलं मला माहिती आहे. मोदी काय सांगतात हे मला जास्त माहिती आहे. यांना काय माहीत. पण एक अतिशहाणा, मोदींचा आदेश पाळत नाही. सरकारचा, मोदींचा प्रचार न करता उद्धव ठाकरे, शिवसेना, संजय राऊत यांच्याबद्दल बोलतो. शेवटी व्हायचं ते झालं. वारंवार जीभ घसरली. त्याला एकदा लगाम घालणं गरजेचं होतं. ते आम्ही कायद्याने केलं, असा हल्लाही त्यांनी चढवला.