पिंपळगावजवळ बर्निंग कारचा थरार ; मारूती व्हॅनने घेतला पेट

पिंपळगावकडून जोपळरोडवरून जात असताना चालत्या व्हॅनमधून धूर येऊ लागला. वायरिंगमधील बिघाडामुळे गॅस व पेट्रोलने अचानक पेट घेतल्याने स्थानिकांनी याबत तातडीने येथील अग्निशमन विभागास माहिती दिली.

    पिंपळगाव बसवंत : पिंपळगावजवळील जोपूळरोड शिवारात वायरींगमध्ये िबघाड झाल्याने मारुती व्हॅनने अचानक पेट घेतला. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

    पिंपळगाव बसवंत शहरातील जोपूळ शिवारातील कपिल खोडे यांची मारुती व्हॅन (क्रमांक एमएच १५ सीएम ८६९०) ही गेल्या चार ते पाच दिवसापासून घरी उभी असल्याने उंदराने वाहनातील वायरींग कुडतली, ही बाब खोडे यांच्या लक्षात न आल्याने पिंपळगावकडून जोपळरोडवरून जात असताना चालत्या व्हॅनमधून धूर येऊ लागला. वायरिंगमधील बिघाडामुळे गॅस व पेट्रोलने अचानक पेट घेतल्याने स्थानिकांनी याबत तातडीने येथील अग्निशमन विभागास माहिती दिली. अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मारुती व्हॅनचे पूर्णपणे जळून खाक होत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी विनायक गवांदे, वसंत काळे, रवींद्र बैरागी आदी उपस्थित होते.