मनमाड-मालेगाव रस्त्यावर ‘बर्निंग ट्रक’चा थरार; दाेघांचा मृत्यू

सोमवार (दि. ३१) रोजी सायंकाळी मनमाड रस्त्यावर भरधाव वेगाने सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.

    मालेगाव : मालेगाव-मनमाड रस्त्यावरील कौळाणे गावाजवळ सोमवारी रात्री ट्रक व आयशरमध्ये जाेरदार धडक झाली. या धडकेनंतर दाेन्ही वाहनांनी पेट घेतलेल्या हाेरपळून दाेघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

    सोमवार (दि. ३१) रोजी सायंकाळी मनमाड रस्त्यावर भरधाव वेगाने सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच मालेगाव अग्निशमन दल आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावर वाहतुकीचा सुमारे ३ तास खोळंबा झाला. आग आटोक्यात आणल्यानंतर दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. हा टँकर पुणे येथून राजस्थानकडे जात होता. तर आयशर ट्रक हा मनमाडकडे येथे जात होता.