The tree fell on the running car; Three teachers killed on the spot

    नाशिक : नाशिक कळवण रस्त्यावर दिंडोरी नजीक वलखेडफाट्यावर आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चालत्या आर्टिगा कारवर झाड कोसळले. या अपघातात अलंगुन ता सुरगाणा येथील तीन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वणी कडून नाशिककडे जाणाऱ्या एम एच 15 एफ एन 0997 या सफेद रंगाच्या मारुती आर्टिगा या कारवर वलखेड फाट्यावर फॉर्च्यून कंपनी जवळ वाळलेले झाड अचानक कोसळले. या अपघातात कारच्या मागील सीटवर बसलेले तीन शिक्षक दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय51) राहणार किशोर सूर्यवंशी मार्ग दिंडोरी रोड नाशिक, रामजी देवराम भोये (वय 49) नाशिक, नितीन सोमा तायडे( वय32l) रा रासबिहारी लिंक रोड नाशिक हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

    कारचा ड्रायव्हर आणि त्याच्या जवळच्या सिटवर बसलेल्या व्यक्तीला किरकोळ जखमा झाल्या आहेत. तीनही शिक्षक सुरगाना येथील शहीद भगतसिंग माध्यमिक विद्यालय अलंगुन येथील असल्याचे समजते.